आगामी काळातील निवडणुका/ सण या अनुषंगाने पालघर रेल्वे स्टेशन येथे (EYES AND EARS) रेल्वे पोलीस सुरक्षा /नियोजन..!

उपसंपादक : मंगेश उईके
पालघर :-1)आगामी काळातील व्हीआयपी दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर सर्तक राहावे अशी माहिती देण्यात आली आहे.
2)स्टेशन परिसरात असतांना काही संशयित आढळल्यास त्याची माहिती तात्काळ पोलिसांना द्यावी.
3) चोरीच्या घटना, महीला छेडछाड, मारामारी यासारख्या घटनांवर लक्ष ठेवावे. रेल्वे प्रवाशांना नाहक त्रास होणार नाही याची काळजी घ्यावी.
4) रेल्वे प्रवाशांना योग्य ते मार्गदर्शन व सहकार्य करावे.
5) देशात चालु असलेल्या राजकिय/धार्मिक घडामोडीचा अनुषंगाने काही समाजकंटका मार्फत अनुचित प्रकार घडु नये यासाठी पोलीस मित्र म्हणुन पोलीस प्रशासनास मदत करावी.
6) आपल्या आजूबाजूच्या परिसरात कायदा व सुव्यवस्थेला बाधा निर्माण होणाऱ्या लहान- मोठ्या गोष्टीबाबत माहिती पोलीस प्रशासनास द्यावी.
7) सध्या समाजामध्ये सोशल मीडियाद्वारे आक्षेपार्ह मजकूर प्रसारित होत असून त्यावर आपण कोणीही विश्वास ठेवू नये. तसेच असे मजकूर प्रसारित होत असतील तर त्याबाबत पोलीस प्रशासनास माहिती दयावी.
8) संशयित इसमाच्या हालचालींवर लक्ष ठेऊन त्याची माहिती पोलिसांना दयावी.
9) अलीकडच्या काळात मोठ्या प्रमाणात ऑनलाइन फसवणूक होत आहे त्या बाबत योग्य ती खबरदारी घ्यावी.
10) रेल्वे परिसरात नियमित काम करत असताना बेवारस बॅग, संशयास्पद वस्तू, इलेक्ट्रॉनिक वस्तू तसेच संशयास्पद व्यक्ती अगर हालचाली दिसल्यास त्याची माहिती GRP तसेच RPF यांना द्यावी किंवा हेल्पलाईन नं-1512, 139 वर माहिती द्यावी
सदर कार्यक्रमाचे नियोजन पोलीस आयुक्त लोहमार्ग मुंबई यांच्या यांच्या संकल्पनेतून
सचिन इंगवले यांच्या मार्गदर्शना खाली करण्यात आले.






सदर अमेय महाजन,सहापोनि कातीवले,पोउपनि सावरकर, गोपनीय शाखेचे पोलीस अंमलदार, 09 पोलीस अंमलदार, 06 होमगार्ड,06 तसेच पोलीस मित्र,रिक्षा चालक सर्वतोपरी सहकार्य करण्याबाबत आवाहन करण्यात आले.
ताजी बातमी व जाहिरातीसाठी संपर्कः
मोबा.नं. 9920601001
info@surakshapolicetimes.com
diptibhogal@surakshapolicetimes.com