आगामी रमजान ईद, डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती, श्रीराम नवमी सणांचे तसेच लोकसभा निवडणुक 2024 च्या अनुषंगाने पालघर रेल्वे स्टेशन येथे (EYES AND EARS) पोलीस मित्र बैठक संपन्न..
प्रतिनिधी-मंगेश उईके
पालघर : माननीय पोलीस आयुक्त, लोहमार्ग मुंबई यांच्या 𝙴𝚈𝙴𝚂 𝙰𝙽𝙳 𝙴𝙰𝚁𝚂 या संकल्पनेनुसार पालघर लोहमार्ग पोलीस ठाणे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सचिन इंगवले यांच्या मार्गदर्शनाखाली प्राप्त इनपुट व वारंवार रेल्वे कार्यक्षेत्रात घडणाऱ्या अप्रिय घटना तसेच रमजान ईद, डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती, श्रीराम नवमी महावीर जयंती तसेच लोकसभा निवडणुक २०२४ अनुषंगाने आज दिनांक ०६/०४/२०२४ रोजी १६:५० ते १७:२० वा. पर्यंत पालघर रेल्वे पोलीस ठाणे हद्दीतील पालघर रेल्वे स्थानक फलाट क्रमांक 01 वर मेन गेटजवळ पोलीस मित्र बैठक घेण्यात आली.

सदरची बैठकी दरम्यान रेल्वे स्थानक परिसरात कोणताही अनुचित प्रकार घडू नये याकरिता खालील प्रमाणे सूचना देण्यात आल्या.

१) सदर उपस्थित सदस्यांना माननीयांच्या POLICE COMMUNITY अंतर्गत EYES AND EARS संकल्पनेबाबत माहिती देऊन त्यांनी रेल्वे प्रवासात व स्थानक परिसरात पोलिसांचे डोळे व कान बनवून सतर्कता बाळगणे बाबत माहिती देण्यात आली.
२) रेल्वे ट्रॅक लगत एखादी संशयास्पद वस्तू अथवा इसम दिसल्यास तसेच कोणताही प्रवासी प्राण्यांची व मांसांची अवैध वाहतूक करीत असल्यास व ते आढळून आल्यास त्याची माहिती तात्काळ कर्तव्यावरील पोलीस अंमलदार अथवा रेल्वे पोलीस हेल्पलाईन क्र. १५१२ यांना कळवावी.

३) स्वतःच्या मोबाईलमध्ये रेल्वे पोलीस हेल्पलाईन क्र. १५१२ व रेल्वे रेल्वे सुरक्षा बल क्र.१३९ हे टोल फ्री नंबर जतन करून ठेवावेत.
४) रेल्वे गाडीत / रेल्वे स्थानकात विनापलक /चुकलेले लहान मूल दिसून आल्यास त्यास रेल्वे पोलिसांच्या हवाली करावे.
५) प्रवाशांना सहनुभूतीपूर्वक वागणूक देण्याचे आवाहन करण्यात आले.
६) असामाजिक तत्वांची माहिती पोलिसांना द्यावी आपलं नाव गुप्त ठेवण्यात येईल,
७) कोणत्याही रेल्वे प्रवाशाचे सामान आपल्यापाशी ठेवू नये ते स्टेशन मास्तर किंवा पोलीस ठाण्यात आणून जमा करावे.
८) रेल्वे प्रवाशांना नाहक त्रास होणार नाही याची दक्षता घ्यावी.
९) रेल्वे प्रवाशांना योग्य ते मार्गदर्शन व सहकार्य करावे.
सर्व पोलीस मित्र सदस्यांनी आपापसात समन्वय ठेवून सहकार्य करणेबाबत सकारात्मकता दर्शविलेली आहे. तसेच सर्वतोपरी सहकार्य करण्याबाबत आव्हान केले आहे. सर्व उपस्थित अधिकारी व पोलीस मित्र यांचे आभार मानून बैठकीचा समारोप करण्यात आला.
सदर बैठक आमच्या मार्गदर्शनाखाली पोउपनि. मुडावदकर, ०3 पोलीस अंमलदार ,होमगार्ड तसेच गोपनीय शाखेचे अंमलदार पोहवा.2860 मोर, पालघर रेल्वे स्टेशनवरील कँन्टीग कामगार, वेन्डर असे 14 सदस्य उपस्थित होते. उपस्थितांना दिलेल्या सूचना समजलेल्या असून त्यांनी सूचनांची अंमलबजावणी आम्ही तात्काळ करू व आमचे इतर सदस्य यांना देखील सदर सूचना सांगत आहोत असे सांगितले. तसेच सर्वतोपरी सहकार्य करण्याबाबत आव्हान करण्यात आले.
ताजी बातमी व जाहिरातीसाठी संपर्कः
मोबा.नं. 9920601001
info@surakshapolicetimes.com
diptibhogal@surakshapolicetimes.com