अति उल्लेखनीय कामगिरीबद्दल पोलीस उप महानिरीक्षक सायबर श्री. संजय शिंत्रे यांचा सुरक्षा पोलीस टाइम्स तर्फे विशेष सत्कार…

संपादिका – दिप्ती भोगल
मुंबई ;
महाराष्ट्र पोलीस अभिलेखावरील अति उल्लेखनीय अशी कामगिरी करून आपल्या पोलीस खात्याची मान उंचावल्याबाबत मुंबईतील महाराष्ट्र सायबर सेलचे पोलीस उप महानिरीक्षक श्री संजय शिंत्रे IPS अधिकारी यांचा सुरक्षा पोलीस टाइम्स तर्फे विशेष सत्कार करण्यात आला.
यावेळी IPS अधिकारी श्री. संजय शिंत्रे यांचा एक जाणता *राजा शिवछत्रपती* पुरस्काराने सन्मानित करून त्याना सन्मानचिन्ह व प्रशंसनीय पत्र देऊन सन्मानित करण्यात आले.
हा पुरस्कार सुरक्षा पोलीस टाइम्सचे सह संपादक श्री. रणजित मस्के यांच्या हस्ते सुपूर्द करण्यात आला.
यावेळी आमचे आदरणीय श्री. संजय शिंत्रे यांनी आमच्या सह संपादक श्री. रणजित मस्के यांचे यथोचित स्वागत केले.



