अति उल्लेखनीय कामगिरीबद्दल महाड तालुक्यातील अधिकारी राजा शिवछत्रपती पुरस्काराने सन्मानित

संपादिका – दिप्ती भोगल
महाड :२६ जानेवारी २०२५ रोजीच्या प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून महाड तालुक्यात आपल्या महाराष्ट्र शासनाच्या अभिलेखावरील अति उल्लेखनीय कामगिरी केल्याबाबत महाडचे उपविभागीय दंडाधिकारी सन्मानीय श्री. ज्ञानोबा पुंडलिकराव बानापुरे यांना एक आदर्श राजा शिव छत्रपती पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.




त्याचप्रमाणे आपल्या पोलीस खात्यातील अती उल्लेखनीय कामगिरीबद्दल महाड शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सन्मानीय श्री. संतोष उत्तम जाधव, एमआयडीसी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सन्मानीय श्री. जीवन हिंदुराव माने तसेच मुंबई गोवा महामार्गावरील महाड केंद्रातील पोलीस उपनिरीक्षक सन्मानीय श्री. प्रविण शाहजी धडे यांना सुरक्षा पोलीस टाइम्स तर्फे सन २०२५ या वर्षाचा एक आदर्श राजा शिव छत्रपती पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. यावेळी त्याना सुरक्षा पोलीस टाइम्स तर्फे एक सन्मानचिन्ह व प्रशंसनीय पत्र देऊन सन्मानित करण्यात आले . यावेळी महाड तालुक्यातील सुरक्षा पोलीस टाइम्सचे उपसंपादक श्री. राकेश देशमुख, श्री फारूक देशमुख व श्री सखाराम साने आदी पत्रकार उपस्थित होते.