पालघर मध्ये आरोग्यदायी पावसाळी रानभाजी खाण्याची मज्जा अनुभवणार पालघरकर…

प्रतिनिधी :- मंगेश उईके
पालघर :- सेवा भारती पालघर जिल्हा रानभाजी रानातून पानात
रानावनात, मोकळवणात, डोंगरउतारांवर, माळरानात किंवा रस्त्यांच्या / कुंपणांच्या कडेलाही काही खाद्य पण वन्य वनस्पती उगवतात. त्यात असे मानवी अनारोग्यकारक रसायनांचे अवशेष नसल्याने, त्या रानभाज्या खाण्यास चांगल्या ठरतात. यांतील कित्येक रानभाज्या विविध प्रकारच्या रोगांवर मात करण्यास उपयुक्त ठरतात, त्या आरोग्यदायी रानभाज्या आपल्या आहारात येणं अधिक फायदेशीर ठरतं. काही रानभाज्या ‘टॉनिक’ म्हणजे बलवर्धकही ठरू शकतात. अशा आरोग्यदायक वनस्पती जास्त करून पावसाळ्याची सुरुवात झाल्यावर व प्रामुख्याने वर्षाकालातच उपलब्ध असतात. त्या काळात होणाऱ्या पोटांच्या तक्रारी व विकारांवर अशा रानभाज्या उपयुक्त ठरतात, असे पारंपरिक अनुभवाने सिद्ध झालेले मत आहे. अशा भाज्यांची चव चाखायची मज्जा पालघर शहरात मिळाली तर…….
सेवा भारती पालघर जिल्हा यांनी रानभाजी महोत्सव आयोजित केला आहे.
तारीख: 11 ऑगस्ट 2024
वेळ: 10.30 ते 02.00
ठिकाणः ऑर्किड हॉल, स्टेट बँक समोर, माहीम रोड पालघर
जेवण शुल्क: ₹150
पूर्व नोंदणी आवश्यकः 9619800030 हर्षल भानुशाली
ताजी बातमी व जाहिरातीसाठी संपर्कः
मोबा.नं. 9920601001
info@surakshapolicetimes.com
diptibhogal@surakshapolicetimes.com