रसायनी पोलिसांची उत्कृष्ट कामगिरी अपहरण झालेल्या इसमास घेतले ताब्यात…

0
Spread the love

उपसंपादक – रणजित मस्के

रायगड

रसायनी पोलीस ठाणे हद्दीत दिनांक ०९/१०/२०२३ रोजी रात्री ०८:०३ वा. च्या सुमारास “एक सफेद रंगाची इको गाडी नं. एमएच-४६ बी. यु. ६५५१” ह्या मध्ये १० इसम हे तुर्भे येथून माथेरान येथे जाणार आहेत त्यामध्ये ०१ इसमाला अपहरण करून घेवून जात आहे अशी बातमी मा. डी. जी. कंट्रोल यांचेकडून रायगड नियंत्रण कक्ष अलिबाग रायगड येथे प्राप्त झाले.

त्यांनी सदर माहिती रसायनी पोलीस ठाणे येथे कळविली. रसायनी पोलीस ठाणेचे प्रभारी अधिकारी श्री. शत्रुघ्न माळी यांनी तात्काळ पोलीस ठाणेकडील सफौ / श्री. कोळेकर, मपोह/ जाधव, मपोह / सुवर्णा खाडे, मपोना / कांबळे, मपोशि/ स्वप्नाली लोटके, चालक पोशि/ डफळ तसेच वाहतूक शाखेकडील पोशि/ गडाख, पोशि/ धापटे यांनी मौजे दांडफाटा येथे नाकाबंदी करिता रवाना केले.

सदर संशयित गाडी २०:२० वाजता मौजे शेडूंग टोलनाका पास होवून दांडफाटा येथील नाकाबंदी चुकवून पुढे पास झाली असल्याची माहिती मिळाल्याने नाकाबंदीकरिता हजर असलेले पोलीस अंमलदार हे शासकीय वाहन घेवून त्यांनी सदर गाडीचा पाठलाग करून कंट्रोलने गाडीचे लोकेशन फोनद्वारे चौक येथील सी. एन. जी पंपजवळ आहे असे सांगितले असता नाकाबंदी अंमलदार यांनी लोधिवली चौक येथील सी. एन. जी पंपजवळ जावून गाडीचा शोध घेतले असता सदरील गाडी नंबर एमएच-४६ बी. यु. ६५५१ ही लोधिवली चौक येथील सी. एन. जी पंपजवळ असल्याचे दिसून आले. रसायनी पोलीस ठाणेकडील नेमण्यात आलेले नाकाबंदी अंमलदार यांनी सदर गाडीवरील चालक व एक इसमास ताब्यात घेतले.

त्यांची नावे १. राज बजरंग ससाणे, रा. नेरळ पाडा कर्जत, २. निशांत शैलेद्र मोटे, रा. कुलाबा मुंबई हे असून त्यास तुर्भे येथून अपहरण करून आणल्याचे समजले. सदर ठिकाणी खालापूर पोलीस ठाणेचे सपोनि / श्री. सूर्यवंशी व स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेकडील स्टाफ हजर झाले. सदरची घटना ही दहिसर पोलीस ठाणे हद्दीतील असल्याने सदर बाबत दहिसर पोलीस ठाणे येथे कॉ.गु. रजि. नं. ९२१/२०२३ भा. द. वि. कलम ३६५,५०४,५०६,३५ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील कार्यवाही करिता दहिसर पोलिसांनी गुन्ह्याच्या तपास कामी गाडीवरील चालक व अपहरण झालेल्या इसमास ताब्यात देण्यात आले आहे.

सदरची कामगिरी मा. श्री. सोमनाथ घार्गे, पोलीस अधीक्षक रायगड, मा. श्री. अतुल झेंडे, अपर पोलीस अधीक्षक रायगड, व मा. श्री. विक्रम कदम, उप विभागीय पोलीस अधिकारी, खालापूर विभाग यांच्या मार्गदर्शनाखाली शत्रुघ्न माळी, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, रसायनी पोलीस ठाणे, मपोह/ जाधव, मपोह / सुवर्णा खाडे, मपोना / कांबळे, मपोशि/ स्वप्नाली लोटके, चालक पोशि/ डफळ तसेच वाहतूक शाखेकडील पोशि/ गडाख, पोशि/ धापटे यांनी उत्कृष्ट कामगिरी केलेली आहे.

ताजी बातमी व जाहिरातीसाठी संपर्कः
मोबा.नं. 9920601001
info@surakshapolicetimes.com
diptibhogal@surakshapolicetimes.com

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

रिसेंट पोस्ट