“पोलीस-विद्यार्थी-पालक मित्रमेळावा” केशोरी पोलीस स्टेशनचा स्तुत्य उपक्रम कार्यक्रमाचे उत्कृष्ठ आयोजन…

उपसंपादक-रणजित मस्के
गोंदिया :

याबाबत थोडक्यात माहिती अशी की, दिनांक 1 जुलै 2023 रोजी शाळेचा पहिला दिवस असल्याने मौजा - ईळदा येथील शासकीय माध्यमिक आदिवासी आश्रम शाळेमध्ये केशोरी पोलीस स्टेशनच्या वतीने मा. श्री. निखिल पिंगळे, पोलीस अधीक्षक, गोंदिया. मा. श्री. अशोक बनकर, अपर पोलीस अधिक्षक गोंदिया, श्री. संकेत देवळेकर, उपविभागीय पोलीस अधिकारी देवरी यांचे मार्गदर्शनाखाली "पोलीस-विद्यार्थी-पालक मित्रमेळाव्याचे आयोजन " करण्यात आले होते. या मेळाव्या मध्ये शाळेतील पहिली ते दहावीचे सर्व विद्यार्थी, त्यांचे पालक, शाळेतील सर्व शिक्षक, ठाणेदार सोमनाथ कदम व पोलीस स्टेशन चा स्टाफ मोठया संख्येने उपस्थित होता.
पोलीस ठाणे केशोरी चे ठाणेदार सपोनि श्री. सोमनाथ कदम यांनी सर्व विद्यार्थी व पालक यांच्यासोबत मनमोकळे पणाने अनेक विषयावर हसत खेळत गप्पागोष्टी केल्या. विद्यार्थ्यांना शिक्षणाचे महत्त्व, आई- वडिलांचे संस्कार, स्पर्धेची युग, व्यसनाधीनता अशा विविध विषयांवर माहिती दिली. पालकांशी बोलताना सायबर क्राईम, आर्थिक गुन्हे, महिला सुरक्षा, बालकांचे संगोपन या विषयांवर चर्चा केली.
पोलिसांशी विविध विषयावर चर्चा करीत असताना सर्व विद्यार्थी भारावून गेले होते. पोलिसांनी राबवलेल्या या उपक्रमाबद्दल पालक व शिक्षक यांना देखील खूप कौतुक वाटले. तसेच पोलिसांकडून अनेक गोष्टी शिकण्यास मिळाल्याचे त्यांनी सांगितले.



सदर मित्रमेळावा यशस्वी करण्यासाठी शाळेचे मुख्याध्यापक श्री दुबे सर, रवी आखरे सर, पोलीस हवालदार सुशील रामटेके, राहुल चिचमलकर यांनी मोलाचे सहकार्य केले.
माननीय वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली सदरच्या मित्रमेळाव्याचे आयोजन पोलीस ठाणे केशोरी चे ठाणेदार सपोनि श्री. सोमनाथ कदम, पोहवा. सुशिल रामटेके, पोहवा. दिपक खोटेले व सर्व अंमलदार यांनी परिश्रम घेतले .

ताजी बातमी व जाहिरातीसाठी संपर्कः
मोबा.नं. 9920601001
info@surakshapolicetimes.com
diptibhogal@surakshapolicetimes.com