पोलीस मुख्यालय गोंदिया येथे प्रथमोपचार (First Aid) जनजागृती प्रशिक्षण शिबिर कार्यक्रमाचे उत्कृष्ट आयोजन…

0
Spread the love

उपसंपादक-रणजित मस्के

गोंदिया :

        पोलीस अधिक्षक गोंदिया मा. श्री. निखिल पिंगळे, अपर पोलीस अधीक्षक श्री. अशोक बनकर, यांचे मार्गदर्शनाखाली

“09 सप्टेंबर जागतिक प्रथमोपचार दिवस निमित्ताने ” गोंदिया जिल्हा पोलीस दलातील पोलीस अधिकारी – अंमलदार व त्यांचे कुटुंबीय यांचेकरिता इंडियन रेड क्रॉस सोसायटी, गोंदिया यांच्या वतीने दिनांक 09/09/2023 रोजी ” प्रेरणा सभागृह”, पोलीस मुख्यालय गोंदिया येथे प्रथमोपचार (First Aid) प्राथमिक माहिती संबंधाने जनजागृती प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आलेले होते.

      सदरचे प्रशिक्षणात इंडियन रेडक्रॉस सोसायटी गोंदिया चे सचिव श्री. रवि कासलीवाल, प्रमुख मार्गदर्शक मास्टर ट्रेनर श्री. आशिषसिंह चौहान,लाईफ मेंबर श्री. गणेश अग्रवाल तसेच श्री  राजन चौबे, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी, गोंदिया व श्री. दिलीप कौशिक, वनपरिक्षेत्र अधिकारी नागझिरा यांचे गोंदिया जिल्हा पोलीस दलाच्या वतीने पुष्पगुच्छ देवुन त्यांचे स्वागत करण्यात आले.

        सदर कार्यशाळेत इंडियन रेड क्रॉस सोसायटी, गोंदिया येथील प्रमुख मार्गदर्शक मास्टर ट्रेनर - श्री. आशिषसिंह चौहान यांनी संबोधित करुन प्रथमोपचार म्हणजे किरकोळ किंवा गंभीर आजार किंवा दुखापत असलेल्या कोणत्याही व्यक्तिला दिलेली पहिली आणि तात्काळ मदत. एखादया व्यक्तिला एका एकी अस्वस्थ वाटु लागल्यास किंवा एखादी जखम झाल्यास वैद्यकिय मदत मिळेपर्यंत त्यावर तातडीने उपचार म्हणुन त्या व्यक्तिला मानसिक धक्का बसु नये या अनुषंगाने जखमेवर / फ्रैक्चर वर बँडेज बांधतांना प्रथम लक्षात घ्यावयाची गोष्ट म्हणजे आपण शांत राहुन प्रथमोपचार कसे करावेत याबाबत विविध उदाहरणे देवुन प्रात्याक्षिक करुन दाखविले. तसेच खाली पडणे, भाजणे, बुडणे, एखादया रस्त्यावरील अपघात, विषबाधा, कुत्रा व साप चावणे यावर प्रथमोपचार संबंधाने अत्यंत मोलाचे मार्गदर्शन दिले. सदर प्रशिक्षणात जवळपास एकुण 85 ते 90 च्या संख्येने पोलीस अधिकारी / अंमलदार, वनविभागातील वन अधिकारी / कर्मचारी व पोलीस कुटुंबीय मोठया संख्येने उपस्थित होते.

   सदर प्रशिक्षणाचे सुत्र संचालन व आभार प्रदर्शन पोहवा. राज वैद्य, मानव संसाधन शाखा, यांनी केले. सदरचे प्रशिक्षण यशस्वीपणे पार पाडण्या करिता पोलीस निरीक्षक तथा अति. कार्य. पोलीस उपअधीक्षक (मुख्या.) श्रीमती नंदिनी चानपुरकर,  सफौ. रोशन उईके, पोहवा राज वैद्य, पोकॉ विशाल सास्तुरे, रोशन येरणे व पोलीस मुख्यालय गोंदिया येथील पोलीस स्टाफ यांनी अथक परिश्रम घेतले.

ताजी बातमी व जाहिरातीसाठी संपर्कः
मोबा.नं. 9920601001
info@surakshapolicetimes.com
diptibhogal@surakshapolicetimes.com

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

रिसेंट पोस्ट