पोलीस ठाणे आमगांव येथे गोंदिया जिल्हा पोलीस दल आणि ग्रामीण रुग्णालय आमगांव यांचे संयुक्त विदयमाने आरोग्य शिबिराचे उत्कृष्ठ आयोजन…

0
Spread the love

उपसंपादक-रणजित मस्के

गोंदिया :- ▶️ याबाबात थोड्क्यात माहिती अशी की, दिनांक 08-07-2024 रोजी पोलीस स्टेशन आमगांव येथे ग्रामीण रुग्णालय आमगांव आणि गोंदिया पोलीस दलातर्फे संयुक्तरित्या वैद्यकीय अधीक्षक डॉ. सागर सोनारे सर यांच्या प्रमुख उपस्थितीत व मार्गदर्शनाखाली रोजच्या धकाधकीच्या जीवनात आरोग्य विषयक निर्माण होणाऱ्या, उद्भवणाऱ्या समस्याचे निवारणार्थ आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.



▶️ NCD कार्यक्रमांतर्गत भौतिकोपचार तज्ञ डॉक्टर कांचन भोयर (PT) यांचे द्वारे पोलीस अधिकारी व अंमलदार तसेच उपस्थितांना दैनंदिन नियमित व्यायाम विषयक मार्गदर्शन करण्यात आले….दर महिन्याच्या दुसऱ्या सोमवारी ग्रामीण रुग्णालय आमगाव येथे भौतिकोपचार तज्ञ ओपीडी च्या वेळेत मार्गदर्शनासाठी उपलब्ध असतील अशी सुध्दा माहिती देण्यात आली.. तसेच NTCP कार्यक्रमांतर्गत सौ. संध्या शंभरकर सामाजिक कार्यकर्त्या यांनी तंबाखू च्या दुष्परिणाम बाबत जनजागृतीपर मार्गदर्शन केले व तंबाखू न खाण्याची शपथ आरोग्य शिबिरात उपस्थितांना तसेच पोलीस अधिकारी अंमलदार यांना देण्यात आली.

▶️ आयोजित आरोग्य विषयक शिबिर कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे ग्रामीण रुग्णालय आमगांव येथील डॉक्टर श्री. हेमंत ठाकरे यांनी तंबाखूच्या दुष्परिणामा बाबत सविस्तर माहिती दिली… तसेच डॉ. श्री . वाल्मीक कोचे यांनी नियमित बी.पी. आणि शुगर तपासणी करण्याचा सल्ला दिला. BP, Sugar तसेच इतर तपासण्या ग्रामीण रुग्णालय आमगाव येथे उपलब्ध असल्याची माहिती पोलीस अधिकारी व अंमलदार यांना दिली. व त्यांचा लाभ घेण्याची सूचना केली… या प्रसंगी आमगांव पोलीस स्टेशनचे सहायक पोलीस निरीक्षक आसाराम चव्हाण, पोहवा. उईके, पोहवा. गजपुरे, मपोहवा छिपे, पोशि. लांजेवार व इतर पोलीस अंमलदार, तसेच गोरेगांव पोलीस स्टेशनचे पोलीस अंमलदार, पोलीस पाटील व शांतता समितीचे सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.

ताजी बातमी व जाहिरातीसाठी संपर्कः
मोबा.नं. 9920601001
info@surakshapolicetimes.com
diptibhogal@surakshapolicetimes.com

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

रिसेंट पोस्ट