सदाबहार अभिनेता सचिन व गायक आदर्श शिंदे महाडमध्ये…

0
Spread the love

उपसंपादक-राकेश देशमुख

महाड :– स्वागताला महिलेने चुकून लावले हळदी-कुंकू.. मात्र सचिन यांच्या उत्तराने एकच हशा पिकला !!

महाड, दि.२3 सप्टेंबर ( रविंद्र कुवेसकर ) रायगड सांस्कृतिक कला मंडळ महाराष्ट्र राज्य या संस्थेच्या वतीने यंदाचा २०२४ कोकणरत्न पहिलाच पुरस्कार निर्माता, दिग्दर्शक, गायक, बहुआयामी सदाबहार अभिनेता सचिन पिळगावकर यांना जाहीर करण्यात आला आहे. खरतर हा पुरस्कार वितरण सोहळा सोम. दि.२३ सप्टेंबर रोजी माणगांव मधिल अशोकदादा साबळे विद्यालयाचे भव्य पटांगणात होणार होता परंतु काही तांत्रिक अडचणी व सध्या वीजांच्या कडकडाटात पडणारा परतीचा मुसळधार पाऊस या कारणास्तव सोहळा माणगांव ऐवजी महाड मधील भव्य अशा डाॅक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारक, नाट्यगृहात उत्साहात संपन्न झाला आहे.

पुरस्कार स्वीकारण्यास सचिन यांचे महाड येथे कार्यक्रम स्थळी आगमन होताच, सवाष्ण महिलांनी आरती ओवाळून स्वागत करताना सचिन यांचे कपाळी चुकून हळदीकुंकू दोन्ही लावले असता त्यांनी हळदीकुंकू हे महिलांना आणि पुरुषांना फक्त कुंकू लावावे असे स्मित हास्याने म्हणताच उपस्थितांमध्ये एकच हशा पिकला. पुरस्कार स्वीकारण्यास सचिन आणि त्यांच्या समवेत गायक आदर्श शिंदे तसेच अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाचे अध्यक्ष मेघराज राजे भोसले महाड येथील भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर राष्ट्रीय स्मारक येथे उपस्थित होते. संस्थेच्या वतीने मेघराज राजे भोसले यांच्या अध्यक्षतेखाली हा सोहळा संपन्न झाला. अभिनेते सचिन यांचा यथोचित सन्मान करून त्यांना हा पुरस्कार मान्यवरांचे हस्ते प्रदान करण्यात आला. याप्रसंगी सचिन सोबत गायक आदर्श शिंदे यांना देखील खास सन्मानित करण्यात आले. संस्थेचे अध्यक्ष डॉ.अजय मोरे, सौ. अंकिता मोरे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आले.

ताजी बातमी व जाहिरातीसाठी संपर्कः
मोबा.नं. 9920601001
info@surakshapolicetimes.com
diptibhogal@surakshapolicetimes.com

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

रिसेंट पोस्ट