स्था. गुन्हे शाखा, सांगली यांनी विना परवाना विदेशी दारु विक्रीसाठी वाहतुक करणा-या २ इसमावर केली कारवाई…

0
Spread the love

सह संपादक -रणजित मस्के

सांगली :-एकुण १६,७९,५००/- रु. चा मुद्देमाल हस्तगत.

पोलीस स्टेशन

एम.आय.डी.सी कुपवाड

अपराध क्र आणि कलम

गु.र.नं. ११७/२०२५, महाराष्ट्र दारुबंदी अधिनियम ६०५ (ड), ८१, ८३ वगैरे.

फिर्यादी नाच

सपोफी. अनिल ऐनापुरे, स्था. गु. अ. शाखा, सांगली,

गु. घ. ता. वेळ दिनांक २०.६.२०२५ रोजी १४.५० ते १७.२० वा चे दरम्यान

गु. दा. ता. वेळ दिनांक २१.०६.२०२५ रोजी ०२.४६ पा

माहिती कशी प्राप्त झाली

सपोफौ, अनिल ऐनापुरे, पोहेकों / अतुल माने, पोना / रणजित जाधव

कारवाई करणारे अधिकारी आणि अंमलदार

मा. संदीप घुगे, पोलीस अधीक्षक, सांगली. यांचे मार्गर्शनाखाली
पोलीस निरीक्षक सतिश शिंदे, स्था. गु. अ. शाखा, सहा पोलीस निरीक्षक, जयदिप कळेकर, स्था. गु. अ. शाखा, सांगली सहा पोलीस निरीक्षक, नितीन सावंत, स्था. गु. अ. शाखा, सांगली सपोफी / अनिल ऐनापुरे, पोहेकौं / संकेत मगदुम, अतुल माने, आगसिद्ध खोत, इम्रान मुल्ला, अमोल ऐदाळे पोना / अनंत कुडाळकर, रणजित जाधव, पोकों/ सोमनाथ पतंगे, रोहन घस्ते, सुशांत चिले.

आरोपीचे नांव पत्ता

१) अक्षय प्रदिप वाघमारे, यय-२० वर्षे, रा. मु. पो. मुलाणकी वरती, आटपाडी, ता. आटपाडी, जि. सांगली. २) नानासाहेब आंनदा पाटील, वय ५१ वर्षे, रा. मु. पो. पाटील मळा, आटपाडी, ता. आटपाडी, जि. सांगली. जपा मुद्देमाल

. ११,७९,५००/- रु किमतीचा वेगवेगळ्या कंपनीचा विदेशी दारुचा साठा.

१ २. ५,००,०००/- रु. एक टाटा कंपनीचा पांढरे रंगाचा टैम्पो, तिचा आर.टी ओ क्र. एम एच १०

डी.टी. ७२०५ अशी कि. जुवाकिजं.

१६,७९,५००/- (सोळा लाख, एकोणऐंशी हजार, पाचशे रुपये मात्र)
गुन्हयाची थोडक्यात हकीकत

मा. पोलीस अधीक्षक, संदीप घुगे यांनी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेस अवैध व बिगरपरवाना दारु विक्री, वाहतुक व कब्जात बाळगणारे इसमांची माहिती काढुन त्यांचेवर कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत.

सदर आदेशाप्रमाणे पोलीस निरीक्षक सतिश शिंदे, स्था. गु. अ. शाखा यांनी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेकडील सहा. पोलीस निरीक्षक जयदिप कळेकर व स्टाफ यांचे एक पथक तयार करून सदर सुचनेप्रमाणे माहिती काढून त्यांचेवर कारवाई करणेकरीता आदेशीत केले होते.

त्या अनुशंगाने दि. २०.०६.२०२५ रोजी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेकडील सहा. पोलीस निरीक्षक, जयदिप कळेकर यांचे पथकामधील सपोफी/ अनिल ऐनापुर, पोहेकों/ अतूल माने आणि पोना /रणजित जाधव यांना त्यांचे बातमीदाराकडून बातमी मिळाली की, इसम नागे अक्षय वाघमारे, रा. आटपाडी हा एम एच १० डी. टी. ७२०५ या टेम्पो चाहनामधून विदेशी दारु घेवून तासगाव फाटा ते कुमटा फाटा या दिशेने जाणार आहे.

नमुद पथक मिळाले बातमीप्रमाणे, तासगाव फाटा ते कुमटा फाटयाकडे जाणारे रोडवर नमूद संशयित वाहनावर बाँच करीत थांबले असता एक संशयित पांढरे रंगाचा टाटा कंपनीचा टैम्पो येत असताना दिसला. त्यात एक चालक व सोबत एक इसम असल्याचे दिसले. त्यांचे वाहन थांबवून त्यांना त्यांची नावे गावे पत्ता विचारला असता त्यांनी त्यांची नाचे वाहन चालक अक्षय प्रदिप वाघमारे, चय २० वर्षे, रा. मु. पो. मुलाणकी वस्ती, आटपाडी, ता. आटपाडी, जि. सांगली आणि शेजारील इसग नानासाहेब आंनदा पाटील, क्य -५१ वर्षे, रा. मु. पो. पाटील मळा, आटपाडी, ता. आटपाडी, जि. सांगली अशी सांगितली. त्यांना मिळाले बातमीची हकीकत सांगुन त्यांना झडतीचा उद्देश कळवुन त्यांचे ताब्यातील टॅम्पों वाहनाची झडती घेतली असता, सदर टैम्पोच्या हौदयामध्ये विदेशी दारु व बिअरच्या बाटल्यांचे बॉक्स मिळून आले. सपोनि, जयदिप कळेकर यांनी चालक अक्षय वाघमारे यास सदर मालाच्या वाहतुकीबाबत अगर जवळ बाळगणेबाबतचा परवाना असल्याबाबत विचारले असता त्यांनी परवाना नसल्याचे सांगितले. सदर गाल कोठून आणला असून तो काठे घेवून जात आहे याबाचत त्यांचेकडे विचारणा केली असता त्यांनी सांगितले की, सदरचा माल मिरज येथील संगम वाईन शॉप येथून घेतला असून तो आटपाडी येथे घेवून जात असल्याचे सांगितले.

लागलीच सहा. पोलीस निरीक्षक, जयदिप कळेकर यांनी सदरचा माल पंचनाम्याने जप्त केला असुन सदर आरोपी विरुध्द सपोफी / अनिल ऐनापुरे यांनी एम. आय. डी. सी. कुपवाड पोलीस ठाणे येथे महाराष्ट्र दारुबंदी कायदयान्वये वरीलप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सदर आरोपी व जप्त मुद्देमाल पुढील तपास व कार्यबाही कामी एम. आय. डी. सी. कुपवाड पोलीस ठाणेकडे वर्ग केला असून पुढील तपास एम. आय. डी. सी. कुपवाड पोलीस ठाणे करीत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

रिसेंट पोस्ट