स्था. गुन्हे शाखा सांगली यांनी विना परवाना अग्निशस्त्र बाळगणारा गुन्हेगार कुमार खेत्रीच्या आवळल्या मुसक्या..

सह संपादक – रणजित मस्के
सांगली

पोलीस स्टेशन
कुंडल
गु.घ.ता. वेळ
दिनांक २४/०४/२०२५ रोजी ११.०० वा.
अपराध क्र. आणि कलम
गु.र.नं. ६४/२०२५, आर्म अॅक्ट
३.२५ प्रमाणे
गु.दा.ता. वेळ
दिनांक २४/०४/२०२५ रोजी
फिर्यादी नाव
पोशि/विनायक एकनाथ सुतार, नेम स्था.गु.अ.शाखा, सांगली
माहिती कशी प्राप्त झाली
पोह / महादेव नागणे पोह / संदिप गुरव
कारवाई करणारे अधिकारी आणि अंमलदार
मा. पोलीस अधीक्षक संदीप घुगे
मा. अपर पोलीस अधीक्षक रितु खोखर
यांचे मार्गदर्शानाखाली
पोलीस निरीक्षक सतिश शिंदे, स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा, सांगली सहा पोलीस निरीक्षक, पंकज पवार, स्था. गु. अ. शाखा, सांगली पोहेकों / महादेव नागणे, संदिप गुरव, सागर लवटे, मछिंद्र बर्डे, सतिश माने, अनिल कोळेकर, सागर टिंगरे, अमर नरळे, द-याप्पा बंडगर, नागेश खरात
पोना/ उदय माळी, संदिप नलावडे पोशि / विनायक सुतार, केरबा चव्हाण, विक्रम खोत अटक वेळ दिनांक दि. २४.०४.२०२५ रोजी
आरोपीचे नाव व पत्ता
रेकॉर्डवरील आरोपी कुमार जगन्नाथ खेत्री, वय ३१ वर्षे, रा
ताकारी, ता वाळया, जि सांगली
जप्त मुद्देमाल
१) ६०,०००/- रु किंमतीचे लोखडी एक देशी बनावटीचे पिस्टल जु. वा. किं. अं.
२) ५००/- रु. किमतीचे ०१ जिवंत राऊड जु. वा. कि. अं.
३) २००/-रू. रोख रक्कम
६०,७००/- (साठ हजार सातशे रुपये मात्र)
गुन्हयाची थोडक्यात हकीकत
मा. पोलीस अधीक्षक संदीप घुगे व मा. अपर पोलीस अधीक्षक रितु खोखर यांनी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेस अवैध अग्निशस्त्रे बाळगणाऱ्या इसमांची माहिती काढुन त्यांचेवर कारवाई करण्याचे आदेश दिले होते.सदर आदेशाप्रमाणे पोलीस निरीक्षक सतिश शिंदे, स्थानिक गुन्हे अन्वेषण, शाखा यांनी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेकडील स्टाफ यांचे एक पथक तयार करुन अवैध अग्निशस्त्र बाळगणाऱ्या संशयित इसमांची माहिती काढुन त्यांचेवर कारवाई करणेकरीता आदेशीत केले होते.
त्या अनुशंगाने स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेकडील पथकातील पोह/महादेव नागणे य पोह/संदिप गुरव यांना गोपनिय बातमीदारामार्फत माहिती मिळाली की, कुमार खेत्री, रा ताकारी हा रेकॉर्डवरील गुन्हेगार कब्जात बिगरपरवाना अग्निशस्त्र बाळगून कुंडल फाटा ते किर्लोस्करवाडी रोडला फिरत आहे.
मिळाले बातमीप्रमाणे वरील पथक हे कुंडल फाटा ते किर्लोस्करवाडी रोडवर सापळा रचून थांबले असता बातमीप्रमाणे एक संशयित इसम रोडवर थांबला असताना दिसला. तसा त्याचा बातमीप्राणे संशय आल्याने त्यास पळून जाण्याची संधी न देता शिताफीने त्यास ताब्यात घेवून त्यास त्याचे नाव गाय विचारता त्याने त्याचे नाव कुमार जगन्नाथ खेत्री, वय ३१ वर्षे, रा ताकारी, ता वाळवा, जि सांगली असे सांगितले. त्यावेळी त्यास त्याचे अंगझडतीचा उद्देश कळवून पंचासमक्ष अंगझडती घेतली असता, त्याचे कब्जात एक देशी बनावटीचे पिस्टल, एक जिवंत काडतुस व रोख रक्कम मिळून आली. सदर देशी बनावटीचे पिस्टल व जिवंत काडतुस बाळगण्याच्या परवान्याबाबत विचारणा केली असता त्याचेकडे याबाबतचा कोणताही कायदेशीर परवाना नसल्याचे त्याने सांगितले.
लागलीच सदरचे अग्निशस्त्र व जिवंत काडतुस पुढील तपास कामी पोह/महादेव नागणे यांनी पंचासमक्ष जप्त करुन आरोपी विरुध्द पोशि/ विनायक सुतार यांनी कुंडल पोलीस ठाणे येथे फिर्याद देवून भारतीय शस्त्र अधिनियम अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सदर आरोपी हा रेकॉर्डवरील गुन्हेगार असून त्याचेवर पलूस, इस्लामपूर, श्रीरामपूर (आहिल्यानगर) व भूईज (सातारा) पोलीस ठाणेस आर्म अॅक्टचे गुन्हे दाखल आहेत.
सदर आरोपी व जप्त मुद्देमाल पुढील तपास कामी कुंडल पोलीस ठाणेकडे वर्ग करण्यात आला असुन पुढील तपास कुंडल पोलीस ठाणे करीत आहेत.