स्था. गुन्हे शाखा सांगली यांनी संजयनगर पोलीस ठाणे कडील खूनाच्या गुन्हयातील आरोपी केला जेरबंद

0
Spread the love

पोलीस स्टेशन

संजयनगर

अपराध क्र आणि कलम

गुरनं १३९/२०२५ बी.एन.एस. कलम १०३ (१) प्रमाणे

फिर्यादी नाव

वसिम मुबारक सय्यद वय-३५ वर्षे पोशि/१७३ नेम- संजयनगर पोलीस ठाणे सांगली.

गु.घ.ता वेळ
गोपनीय बातमी

दि.२५/०६/२०२५ रोजी २२,०० वा ते २६/०६/२०२५ रोजीचे १२.१५ वा.

दि. २६/०६/२०२५ रोजी १७.४७ वा.

पोहेकों / गुंडोपंत दोरकर

कारवाई करणारे अधिकारी आणि अमंलदार

मा. पोलीस अधीक्षक संदीप घुगे, यांचे मार्गदर्शानाखाली पोलीस निरीक्षक सतिश शिंदे स्था.गु.अ. शाखा सांगली पोलीस उपनिरीक्षक कुमार पाटील स्था.गु.अ. शाखा सांगली पोहेकों/गुंडोपंत दोरकर, संदीप पाटील, अतुल माने, पोना/सुशिल मस्के, श्रीधर बागडी, पोकों/अभिजीत माळकर, ऋतुराज होळकर, विनायक सुतार, सुमित सुर्यवंशी,चा. पोकों/सुशांत चिले सायबर पोलीस ठाणे अभिजीत पाटील

आरोपीचे नाव पत्ता

पिंटू तुकाराम पाटील, यय ३६ वर्षे, धंदा मजुरी रा शाहूनगर, विजयनगर, सांगली मुळ गाव – हुलजंती, ता- मंगळवेढा, जि- सोलापूर

मयताचे नाव

शिलवंती पिंटू पाटील वय- ३० वर्षे, रा- शाहुनगर, विजयनगर, सांगली,
गुन्हयाची थोडक्यात हकीकत

दिनांक २५/०६/२०२५ रोजी २२.०० वा. ते दिनांक २६/०६/२०२५ रोजी १२.१५ वा चे सुमारास यातील मयत नामे शिलवंती पिंटू पाटील वय ३० वर्षे हिचा राहते घरी तिचा नवरा पिंटू पाटील याने कोणतेतरी अज्ञात कारणावरुन लाकडाच्या बांबूने मयतेचे कपाळावर, डोक्यात मारुन तिचा खून केला आहे. त्याबाबत संजयनगर पोलीस ठाणेस गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.

मा. पोलीस अधीक्षक श्री. संदीप घुगे यांनी सदर गुन्हयांचे गांभीर्य ओळखून सदर गुन्हा उघडकीस आणून आरोपीस ताब्यात घेणेबाबत आदेशीत केले होते.

सदर सुचनेप्रमाणे पोलीस निरीक्षक सतिश शिंदे स्था.गु.अ.शाखा यांनी पोलीस उपनिरीक्षक कुमार पाटील यांचे एक पथक तयार केले.

सदर पथकातील पोहेकॉ/१३५८ गुंडोपंत दोरकर यांना त्यांचे खास बातमीदारामार्फत तसेच तांत्रिक माहिती व्दारे सदर आरोपी हा आंत्रोळी ता-मंगळवेढा जि-सोलापूर येथे असलेबाबत खात्रीशीर माहिती मिळाल्याने पोलीस उपनिरीक्षक कुमार पाटील यांचे पथक लागलीच सोलापूर जिल्हा येथे रवाना झाले.

सदर पथकाने त्या ठिकाणी जाऊन गोपनीय बातमीदारामार्फत माहिती घेऊन संशयितास आंत्रोळी ता-मंगळवेढा जि-सोलापूर येथून ताब्यात घेतले. सदर आरोपीकडे गुन्हयाचे अनुषंगाने चौकशी केली असता चारित्र्याच्या संशयावरुन पत्नी शिलवंती हिचेशी रात्री वाद झाला होता. त्या वादातून पत्नी झोपलेनंतर आरोपीने घरातील लाकडी दांडक्याने तिचे डोकीत मारुन तिचा खून केला असल्याची कबूली दिली आहे.

सदर आरोपी पिंटू तुकाराम पाटील, यय ३६ वर्षे, धंदा मजूरी रा- शाहुनगर, विजयनगर, सांगली, मुळ बाव हुलजंती, ता मंगळवेढा, जि-सोलापुर यास पुढील तपास कामी संजयनगर पोलीस ठाणेकडे वर्ग करण्यात आले असून पुढील तपास संजयनगर पोलीस ठाणे करीत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

रिसेंट पोस्ट