स्था. गुन्हे अ. शाखा सांगली यांनी पैशाच्या देणे घेणे वरून अपहरण केलेल्या निहाल पवारची केली सुटका…!

0
Spread the love

पोलीस स्टेशन
फिर्यादी नाव

वडनेर खाकुर्डी पोलीस ठाणे (नाशिक ग्रामीण)

१०५/२०२५ बी.एन.एस. कलम १४० (२), १४० (३)

मिनाबाई सुभाष पवार, रा अजनाळे, जि धुळे

गु.घ.ता वेळ

माहिती कशी प्राप्त झाली

दि. १६/०३/२०२५ रोजीचे ०२.०० वा.

१७/०३/२०२५ रोजी

पोह / दिपक गायकवाड संजयनगर पोलीस ठाणे

कारवाई करणारे अधिकारी आणि अंमलदार मा. पोलीस अधीक्षक संदीप घुगे, मा. अपर पोलीस अधीक्षक रितु खोखर
यांचे मार्गदर्शानाखाली
पोलीस निरीक्षक सतिश शिंदे, स्था. गु. अ. शाखा, सांगली सहा पोलीस निरीक्षक, जयदीप कळेकर, स्था. गु. अ. शाखा, सांगली पोहेका / संजय पाटील, अतुल माने, अरूण पाटील पोना / श्रीघर बागडी, पोकों/सुमित सुर्यवंशी, अजय बेंदरे, विनायक सुतार

अटक दिनांक दि.१८/०३/२०२५ रोजी

अपहरीत इसम नामे

निहाल सुभाष पवार, वय २३ वर्षे, रा अंजनाळे, जि धुळे

आरोपीचे नाव व पत्ता

१) शरद बाळासो गलांडे, वय

२२ वर्षे, रा रेल्वे स्टेशनजवळ, रांजणी, ता कवठेमहांकाळ

२) शंकर दत्तात्रय गिड्डे, वय

२२ वर्षे, रा रामपूरवाडी रोड, करोली टी, ता कवठेमहांकाळ

उघडकीस आलेला गुन्हा

वडनेर खाकुर्डी पोलीस ठाणे (नाशिक ग्रामीण) गु.र.नं. १०५/२०२५ बी.एन.एस. कलम १४० (२), १४०(३)

जप्त मुद्देमाल

१) ५,५०,०००/-रू. एक काळ्या रंगाची स्कॉपिओ चार चाकी
५,५०,०००/-रू. एकूण

गुन्हयाची थोडक्यात हकीकत-

दि. १७/०३/२०२५ रोजी इसम नामे निहाल पवार यास करंजगव्हाण (जि धुळे) शिवारात कोणीतरी अज्ञात इसमानी अज्ञात कारणासाठी बळजबरीने काळ्या रंगाचे स्कॉर्पिओ गाडीत बसवून अपहरण केले असलेबाबत वरील प्रमाणे वडनेर खाकुर्डी पोलीस ठाणे (नाशिक ग्रामीण) येथे गुन्हा नोंद करण्यात आला आहे.वरील गुन्हयातील अपहरीत इसम व आरोपींचा शोध घेणेकरीता मदत करणेबाबत वडनेर खाकुर्डी पोलीस ठाणेचे पत्र प्राप्त झाले. सदर गुन्हयाचे गांभीर्य व आरोपीकडून अपहरीत व्यक्तीच्या जीवास असलेला धोका पाहून मा. पोलीस अधीक्षक संदीप घुगे, यांनी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेस सदर गुन्हयातील अपहरीत इसम व आरोपींचा शोध घेणेबाबत आदेश दिले होते.

सदर आदेशाप्रमाणे पोलीस निरीक्षक सतिश शिंदे, स्था. गु. अ. शाखा यांनी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेकडील सहा. पोलीस निरीक्षक जयदीप कळेकर व स्टाफ यांचे एक पथक तयार करुन अपहरीत इसम व आरोपींचा शोध घेणेबाबत आदेशीत केले होते.

त्या गुन्हयाचे अनुशंगाने पोहेका / दिपक गायकवाड यांना त्यांचे बातमीदाराकडून बातमी मिळाली की. सदर गुन्हयातील आरोपी हे कवठेमहांकाळ येथील अलकुड फाटा येथे संशयितरित्या थांबलेले आहेत. नमुद पथकाने मिळाले बातमीप्रमाणे कवठेमहांकाळ येथील अलकुड फाटा येथे जावून अलकुड फाटा येथील बंद मका फॅक्टरीच्या आवारात सापळा लावून थांबले असता फॅक्टरीच्या आवारात एक काळ्या रंगाची स्कॉर्पिओ चारचाकी वाहन थांबलेले दिसले. तसा त्याचा बातमीप्रमाणे संशय आल्याने सदर ठिकाणी जावून सहा पोलीस निरीक्षक जयदीप कळेकर व पथकाने पळून जाण्याची संधी न देता गाडीतील इसमांना खाली उतरा असा इशारा केला असता दोन इसम खाली उतरले. त्यांना ताब्यात घेवून त्यांचे नाव गाव विचारता त्यांनी त्यांची नावे १) शरद बाळासो गलांडे, वय २२ वर्षे, रा रेल्वे स्टेशनजवळ, रांजणी, ता कवठेमहांकाळ २) शंकर दत्तात्रय गिड्डे, वय २२ वर्षे, रा रामपूरवाडी रोड, करोली टी, ता कवठेमहांकाळ अशी सांगितली. सदर स्कॉर्पिओ गाडीची पाहणी केली असता सदर गाडीच्या पाठीमागील बाजूच्या सीटवर एक इसम घाबरलेल्या अवस्थेत बसलेला दिसला. सदर इसमास खाली उतरून त्याचे नाव विचारले असता त्याने त्याचे नाव निहाल सुभाष पवार, वय २३ वर्षे, रा अंजनाळे, जि धुळे असे सांगितले. सदर इसमाकडे चौकशी केली असता त्याने सांगितले की, शरद गलांडे व शंकर गिड्डे यांनी करंजगव्हाण (जि धुळे) शिवारातून आर्थिक देवाण घेवाण वरून बळजबरीने स्कॉपिओ गाडीतून त्याचे अपहरण करून त्याचे सुटकेसाठी त्याचे घरचे लोकांकडे फोनवरून पैशाची मागणी करत होते.

त्यानंतर अपहरीत इसम निहाल पवार यास सुरक्षितेकरीता ताब्यात घेतले. सदर अपहरीत इसमांचे नातेवाईक यांनी त्यास ओळखले असून यावरून वरील नमूद आरोपी हे सदर गुन्हयातील असलेबाबत निष्पन्न झाले.

सदर गुन्हयातील अपहरीत इसम, आरोपी व स्कॉर्पिओ गाडी पुढील तपास कामी वडनेर खाकुर्डी पोलीस ठाणेचे ताब्यात देण्यात आले असून पुढील तपास वडनेर खाकुर्डी पोलीस ठाणे (नाशिक ग्रामीण) करीत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

रिसेंट पोस्ट