इलेक्ट्रीक डीपी चोरी व मोटार सायकली चोरी करणा-या आरोपींना लोणंद पोलीसांनी केले जेरबंद…

उपसंपादक-रणजित मस्के
सातारा :– लोणंद पोलीस ठाणे हददीत इलेक्ट्रीक डीपी चोरी व दुचाकी वाहन चोरी सारखे गुन्हे दाखल झाले होते. सदर गुन्हयाचे तपासाबाबत मा. पोलीस अधीक्षक सो सातारा समीर शेख, मा. अप्पर पोलीस अधीक्षक सो. आंचल दलाल मॅडम, मा. उपविभागीय पोलीस अधिकारी श्री. राहुल धस सो, यांनी सुचना दिल्या होत्या.
त्या प्रमाणे वरीष्ठांनी केलेल्या मार्गदर्शनावरुन लोणंद पोलीस ठाण्याचे प्रमारी श्री सुशिल भोसले, सहाय्यक पोलीस निरिक्षक व पोलीस अंमलदार यांनी सदर घडणा-या गुन्हयाबाबत कॉबिग ऑपरेशन राबवुन तसेच गोपणीय खब-यांमार्फत माहीती मिळवून मिळाले माहीतीचे आधारे यातील आरोपी निष्पन्न केले.
दिनांक २२/०२/२०२४ रोजी यातील आरोपी हे बडेखान ता. फलटण परीसरात येणार असल्याची खात्रीशीर माहीती मिळताच माः वरीष्ठ अधिकारी सो. यांचे मार्गदर्शनाखाली श्री. सुशिल भोसले, सहायक पोलीस निरिक्षक व गुन्हे प्रकटीकरण पथकाने एका आरोपीसह दोन विधीसंघर्ष बालकांना चोरी केलेल्या मोटार सायकलसह ताब्यात घेवुन पोलीस स्टेशनला आणले. त्यांचेकडे अधिक विचारपुस केली असता त्यांनी लोणंद पोलीस स्टेशन हद्दीतील शेरेचीवाडी, तांबवे, मुळीकवाढी, हिंगणगाव ता. फलटण व खेड बुद्रुक, लोणंद ता. खंडाळा येथील डीपी चोरीचे एकुण ८ गुन्हे व लोणंद, फलटण ग्रा पो.स्टे, वाठार पोस्टे पुसेगाव पो.स्टे. हददीतील मोटार सायकल चोरीचे एकुण ६ गुन्हे केल्याचे निष्पन्न झाले व गुन्हयातील आरोपींचे साथीदार यांची नावे निष्पन्न केली आहेत.
आरोपींनी चोरी केलेले डीपीतील तांबे व मोटार सायकली हस्तगत करण्यात आल्या आहेत. आरोपींनी लोणंद तरोच इतर पोलीस ठाणे हददीत खालील प्रमाणे केलेल्या गुन्हयाची कबुली दिली आहे
अन पोलीस ठाणे
लोणंद पोलीस ठाणे
गु.र.नं. ८०/२०२४ भादवि कलम ३७९
गु.र.नं. ९१/२०२२ भादवि कलम ३७९
गु.र.नं. १५/२०२४ भादवि कलम ३७९,४२७ सह भाविका कलम १३६
गु.र.नं. ४२/२०२४ भादवि कलम ३०९,४२७ सह भाविका कलम १३६
गु.र.नं. ६८/२०२४ भादवि कलम ३७९,४२७ सह भाविका कलम १३६
गु.र.नं ३४५/२०२३ भादवि कलम ३०९,४२७ सह माविका कलम १३६
गु.र.नं. ५६९/२०२३ भादवि कलम ३७९,४२७ सह भाविका कलम १३६
४६५/२०२३ भादवि कलम ३०९,४२७ सह माविका कलम १३६
गु.र.नं ५४४/२०२३मादवि कलम ३७९,४२७ सह भाविका कलम १३६
गु.र.नं. ४३३/२०२३भादवि कलम ३७९,४२७ सह भाविका कलम १३६
गु.र.नं. ७९/२०२४ भादवि कलम ३७९
वाठार पोलीस ठाणे गु.र.नं. २५०/२०२३ भादवि कलम ३७९
वाठार पोलीस ठाणे पुसेगाव पो. ठाणे
गु.रं.नं . २६४/२०२३ भादवि कलम ३७९
गु.रं.नं. २८/२०२४ भादवि कलम ३७९
सदर गुन्हयाचा तपास मा.पोलीस अधीक्षक सो सातारा सभीर शेख, मा. अप्पर पोलीस अधीक्षक सो, आंचल दलाल मॅडम, मा. उपविभागीय पोलीस अधीकारी साो. राहुल धस यांचे मार्गदर्शनाखाली लोणंद पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री सुशिल भोसले, गुन्हे प्रकटीकरण पथकाचे पोहवा संतोष नाळे, सर्जेराव सुळ, विठ्ठल काळे, केतन लाळगे तसेच पोहवा नितीन भोसले, अभिजित घनवट, गोविंद आंधळे, नाना मिसे, सतिश दडस, दिलीप येळे, संजय बनकर, सिध्देश्वर वाघमोडे, तसेच होमगार्ड जयदिप भोईटे, रब्बानी शेख, हेमंत येळे, कर्षे यांनी सदर कारवाई मध्ये सहभाग घेतला असुन मा. पोलीस अधिक्षक सो सातारा यांनी अभिनंदन केले आहे.
ताजी बातमी व जाहिरातीसाठी संपर्कः
मोबा.नं. 9920601001
info@surakshapolicetimes.com
diptibhogal@surakshapolicetimes.com