वृद्ध महीलेस नजरबाधा झाल्याचे भासवुन आर्थिक फसवणुक करणा-या दोन विधीसंघर्षग्रस्त बालकांना शाहुपुरी पोलीसानी घेतले ताब्यात..

0
Spread the love

ठाणेकडील एक फसवणुकीचा गुन्हा उघड. 1,68,950/- रु किंमतीचा मुद्देमाल जप्त.

उपसंपादक-रणजित मस्के

कोल्हापूर:

मा. पोलीस अधीक्षक, श्री. महेंद्र पंडित सो यांनी कोल्हापूर जिल्ह्यात होत असलेल्या फसवणुकीचे गुन्हे उघडकीस आणणेच्या दृष्टीने स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक रविंद्र कळमकर तसेच दुय्यम अधिकारी यांना जिल्ह्यातील मालाविरुध्दचे तसचे फसवणुकीचे गुन्ह्यांचा समांतर तपास करुन गुन्हे उघडकीस आणणेबाबत मार्गदर्शन करून सुचना दिल्या होत्या.

मा. पोलीस अधीक्षक साो यांनी दिले सुचनांप्रमाणे पोलीस निरीक्षक, श्री. रविंद्र कळमकर यांनी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा, कोल्हापूर कडील पोलीस उपनिरीक्षक जालींदर जाधव व इतर पोलीस अमंलदार यांचे तपास पथक तयार करून तपास सुरू केला. सदर तपास पथकामार्फत तांत्रीकदृष्ट्या तपास करुन व गोपनीयरित्या माहिती मिळवून फसवणुकीचे गुन्हे उघडकीस आणणेचा प्रयत्न चालू असताना पोलीस अमंलदार लखन पाटील व सागर माने यांना खात्रीशिर गोपनीय माहिती मिळाली की, गु.र.नं. 1137/2024, बी. एन. एस. कलम- 316(2),318 (4) 3(5) प्रमाणे दाखल गुन्ह्यातील फसवणुक करून नेलेली सोन्याची चेन दोन संशयीत इसम घेवून ताराराणी चौक ते तावडे हॉटेल जाणारे रोडलगत असणारे छत्रपती शाहु सांस्कृतीक मंदीर जवळील कंपाउंड जवळ येणार असल्याचे समजल्याने. मिळालेले माहितीचे अनुषंगाने तपास पथकाने दि.24.12.2024 रोजी छत्रपती शाहु सांस्कृतीक मंदीर जवळील कंपाउंड जवळ जावून सापळा लावून दोन विधीसंघर्षग्रस्त बालकांना ताब्यात घेवुन त्यांचे कब्जातुन सोन्याची चेन व गुन्ह्या करतेवळी वापरलेली मोटरसायकल मिळुन आली. नमुद विधीसंघर्षग्रस्त बालक क्र 1 व 2 यांचे कब्जात मिळालेले सोन्याची चेन बाबत तपास केला असता त्याने शाहुपुरी पोलीस ठाणे येथे गु.र.नं. 1137/2024, बी. एन. एस. कलम-316(2), 318(4) 3(5) या फसवणुकीचा गुन्हयाची कबुली दिली असून सदर गुन्हयातील फसवणुक करुन घेतलेली सोन्याची चेन व गुन्ह्यात वापरलेली मोटर सायकल असलेचे सांगीतले. नमुद विधीसंघर्षग्रस्त बालकांचे कब्जातून 68,950 रुपये कींमतीची 9.850 ग्रॅम वजनाचे सोन्याचे चेन व 1,00,000/- रुपये किंमतीची मोटरसायकल असा एकूण 1,68,950, /- रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे. नमुद विधीसंघर्षग्रस्त बालके क्र 1 व 2 यांचेकडुन शाहुपुरी पोलीस ठाणे कडील गुन्हा उघडकीस आला असून त्याचे कब्जात मिळालेले मुद्देमालासह त्यास शाहुपुरी पोलीस ठाणे येथे हजर केले आहे.

सदरची कारवाई मा. पोलीस अधीक्षक, श्री. महेंद्र पंडित साो यांचे मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक श्री. रविंद्र कळमकर, पोलीस उपनिरीक्षक जालींदर जाधव, पोलीस अंमलदार विलास किरोळकर, सचिन पाटील, संजय पडवळ, संजय कुंभार, लखन पाटील, सागर माने, महेश पाटील, विजय इंगळे, शुभम संकपाळ, महेश खोत, संदीप बेंद्रे, विशाल चौगले, हंबीरराव आतिग्रे यांनी केली आहे.

ताजी बातमी व जाहिरातीसाठी संपर्कः
मोबा.नं. 9920601001
info@surakshapolicetimes.com
diptibhogal@surakshapolicetimes.com

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

रिसेंट पोस्ट