एका पत्रकाराच्या पाठपुराव्यामुळे हताश झालेल्या सुरक्षा रक्षकाला मिळाला न्याय…!

0
Spread the love

प्रतिनिधी-रणजित मस्के

ठाणे : बृहन्मुंबई व ठाणे जिल्हा सुरक्षा मंडळातील कल्याण शाखेच्या हद्दीतील केडीएमसी या आस्थापनेत कार्यरत असलेले सुरक्षा रक्षक उमेश शिंदे हे गेल्या ८ डिसेंबर २०२१ रोजी अचानक आजारी पडल्या असल्या कारणाने त्यांनी वैद्यकीय रजा घेतली होती. तसेच याची पूर्ण माहिती ही संबंधित मंडळाच्या कल्याण शाखेच्या कार्यालयाला व आस्थापनेला लेखी स्वरूपात कळवले होते. तसेच २३ एप्रिल रोजी २०२२ रोजी वैद्यकीय फिटनेस प्रमाणपत्र जमा केला असता पुन्हा रजेचे दिवस वाढविण्यात आले. नंतर मंडळाच्या कल्याण शाखेने उमेश यांच्याकडून पुन्हा वैद्यकीय फिटनेस प्रमाणपत्राची मागणी केली. २९ जून २०२२ रोजी उमेशने फिटनेस जमा केल्यानंतर त्यांना त्याच ठिकाणी पुन्हा कामावर हजर करून घेण्यासाठी मंडळाने संबंधित आस्थापनेला पत्र दिले असता, त्याठिकाणी पत्रात नमूद केलेला अन्य सुरक्षा रक्षक उमेश यांच्या जागेवर हजर झाले नसल्याचे आस्थापनेच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.

उमेशने मंडळाच्या कल्याण शाखेत विचारणा केली असता, त्याठिकाणी कायम स्वरूपी सुरक्षा रक्षक पाठविल्याची माहिती दिली. कायम स्वरूपी सुरक्षा रक्षक पाठविण्यात आले असता देखील पुन्हा रुजू होण्याचे पत्र उमेश यांना देण्यात आले, मग सुरक्षा रक्षक उमेशच्या लक्षात आले की आपली दमछाक होत आहे. तसेच उमेश हे गेल्या तीन ते चार महिन्यांपासून मंडळाच्या कार्यालयात फेऱ्या मारून मारून हताश झाले व आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. घडलेला संपूर्ण प्रकरण पत्रकार सतिष एस राठोड यांना कळाले असता मंडळाच्या सानपाडा येथील मुख्य कार्यालयात जाऊन संबंधित प्रकरण कामगार उप आयुक्त तथा मंडळाचे अध्यक्ष मा. श्री अशोक डोके साहेब यांच्या लक्षात आणून दिले व त्यांनी त्या प्रकरणाची तात्काळ दखल घेत संबंधित सुरक्षा रक्षकाला पुन्हा केडीएमसीच्या आस्थापनेत हजर करून घेण्याचे आदेश कल्याण शाखेला दिले.

● मंडळाला कर्तव्यदक्ष अध्यक्ष लाभले ●

बृहन्मुंबई व ठाणे जिल्हा सुरक्षा रक्षक मंडळाला गेल्या ४० वर्षांपासून पहिल्यांदाच सुरक्षा रक्षकांना न्याय देणारे व कर्तव्यदक्ष अधिकारी लाभले आहेत. डोके साहेब हे सुरक्षा रक्षकांना आपल्या परिवाराचा एक सदस्य समजून सहकार्य करत असतात असे पत्रकार श्री.सतिष एस. राठोड यांनी सांगितले .

ताजी बातमी व जाहिरातीसाठी संपर्कः

मोबा.नं. 9920601001

info@surakshapolicetimes.com

diptibhogal@surakshapolicetimes.co

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

रिसेंट पोस्ट