आर्थिक व्यवहारातील पैसे वसुल करण्यासाठी अपहरण केलेल्या पिडीताची ६ तासात सुटका व आरोपीस हडपसर पोलीसांनी केले जेरबंद ..

सह संपादक- रणजित मस्के
पुणे :
दिनांक ०७/०३/२०२५ रोजी रात्रौ ०२.०० वा.चे सुमारास फिर्यादी योगेश हरीलाल विश्वकर्मा यांनी पोलीस ठाणेस येवून कळवीले की, दि.०६/०३/२०२५ रोजी रात्री १०.३० ते १०.४० वा.चे सुमारास फिर्यादी यांच्या राहते घरी अज्ञात ४ ते ५ इसम आले व त्यांनी त्याचे वडीलाकडे फर्निचरचे काम करण्याचे सांगुन त्यांना राहते घरातुन घेवुन गेले. त्यानंतर रात्रौ ०१.०० वा सुमारास फिर्यादी यांचे वडीलांनी कॉल करुन घाचरत बोलत उदया सकाळ पर्यंत घरी येतो असे सांगुन फोनबंद केला. तेव्हा फिर्यादी यांनी सदरचा प्रकार नियंत्रण कक्ष व हडपसर पोलीस स्टेशन येथे समक्ष येवुन घडलेला प्रकार सांगुन तक्रार दिल्याने हडपसर पोलीस ठाणे गु.र.नं २७६/२०२५ भारतीय न्याय संहिता कलम १४०(३), ३५) प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला होता.
दाखल गुन्ह्याचे गांभिर्य ओळखून मा.श्री. डॉ. राजकुमार शिंदे सारे. पोलीस उपआयुक्त, परिमंडळ-०५, पुणे, यांच्या मार्गदर्शनाप्रमाणे व श्री. संजय मोगले, वरिष्ठ पोलीस निरीक्षक हडपसर पोलीस स्टेशन पुणे शहर यांच्या सुचनांप्रमाणे तपासपथक अधिकारी पोलीस उप निरीक्षक हसन मुलाणी, सत्यवान गेंड, व तपास पथक अंमलदार श्रीकांत पांडुळे, अजित मदने, चंद्रकांत रेजितवाड, तुकाराम झुंजार, अमित साखरे, महेश चव्हाण, महाविर लोंढे यांचे पथक तयार केले.
अपहृत इसम यांचे मोबाईल यर आलेल्या कॉलची माहीती घेतली असता, नमुदया क्रमांक हा बंद मिळून आला. दाखल गुन्ह्याचे केले तांत्रिक तपासात संशयीत इसम हे वेळोवेळी आपले ठिकाण बदलत असल्याचे दिसून आले. तसेच संशयीत इसम हे खेड शिवापूर, शिंदेवाडी, जांभूळवाडी, नन्हे भागात फिरत असल्याची माहीती प्राप्त झाली होती. संशयीत इमसांचे वाचत गोपनिय बातमी मिळवून आरोपी हे पिडीतास घेवून कात्रज घाटाच्या पायथ्यास येणार आहेत अशी खात्रीशीर माहीती प्राप्त झाल्याने तपास पथकाने सापळा रचून अपहृत इसम १) हरीलाल रामखिलावन विश्वकर्मा, वय-५५ रा. रॉयलवुड सोसायटी, मांजरी बद्रुक मांजरी पुणे तसेच आरोपीत नामे २) प्राजस दिपक पंडित यय २५ वर्ष रा. स्वामी सदन, त्रिमुर्ती चौक, भारती विदयापीठ पुणे यांना ताब्यात घेतले.
ताब्यात असलेल्या आरोपीत इसमाकडे अधिक तपास करता त्याने हरीलाल विश्वकर्मा यांचे त्याचे साथीदार मनोज भोसले रा. दत्तवाडी पुणे व त्याचे इतर साथीदारांच्या मदतीने मांजरी येथून अपहरण करून आणल्याचे सांगितले. अपहृत व्यक्ती व आरोपी यांच्यात आर्थिक व्यवहार होता. अर्थिक व्यवहारातील पैसे वसुल करण्याचे उद्देशाने अपहरण केल्याची कबुली दिली आहे.
सदरची कामगिरी ही मा. श्री. अमितेश कुमार, पोलीस आयुक्त सारे पुणे शहर, मा. श्री. रंजन कुमार शर्मा, पोलीस सह आयुक्त साो. पुणे शहर, मा. श्री. मनोज पाटील, अप्पर पोलीस आयुक्त साो, पूर्व प्रादेशिक विभाग, मा. श्री.डॉ. राजकुमार शिंदे, पोलीस उप आयुक्त सारे., परिमंडळ ५ यांचे मागदर्शनाखाली मा. अनुराचा उदमले मॅडम, सहाय्यक पोलीस आयुक्त, हडपसर विभाग पुणे, संजय मोगले, वरिष्ठ पोलीस निरीक्षक हडपसर पोलीस स्टेशन, पुणे शहर, निलेश जगदाळे, पोनि. (गुन्हे), यांचे सुचनांप्रमाणे तपास पथकाचे प्रभारी अधिकारी पोलीस उप निरीक्षक हसन मुलाणी, सत्यवान गॅड, अंमलदार अविनाश गोसायी, संदीप राठोड, श्रीकांत पांडुळे, दिपक कांबळे, चंद्रकांत रेजितचाड, अजित मदने, अमोल दणके, कुंडलीक केसकर, अमित साखरे, अभिजीत राऊत, तुकाराम झुंजार, महाचिर लोंढे, महेश चव्हाण, बापू लोणकर, अमोल जाधव यांचे पथकाने प्रशंसनीय कामगिरी केली आहे.