डायसन फाऊंडेशन अतुल तारासिंग राठोड ( संस्थापक अध्यक्ष ) ह्यांचा वतीने रक्तदान शिबिराचे आयोजन संपन्न..

सह संपादक -रणजित मस्के
ठाणे


आदिवासी पाड्यातील गरजू मुलांसाठी शालेय विद्यार्थ्यांना शिकण्यासाठी लागणारे वह्या स्टेशनरी चे साहित्य देण्यासाठी मदतीचे आव्हान करण्यात आले होते त्याला भरघोस प्रतिसाद मिळाले, तसेच लोढा सुप्रीमसी सारख्या कॉर्पोरेट कंपन्या मधे रक्तदान शिबिराचे आयोजन करून एकूण 94 युनिट रक्त संग्रह करण्यात आले , आणि 14 जणांनी नेत्र दानाचे रजिस्ट्रेशन केले,. ह्या शिबिरामध्ये देवदूत असे ज्यांचे उल्लेख होतो असे
ऊप मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि श्रीकांत शिंदे फाऊंडेशन चे वैद्यकीय सहायता कक्षा चे प्रमुख आदरणीय मंगेश दादा चिवटे ह्यांनी स्वतः रक्तदान केले आणि मी केलेल्या 164 वेळा केलेल्या रक्तदानाचे आवर्जून उल्लेख केले आणि माझे सेवा रत्न पुरस्काराने देऊन सन्मानित करण्यात आले माजी सोबत आदरणीय विनय शेट्टी, मंगेश दादा चिवटे साहेब, नेत्र दान चे चळवळ उभे करणारे श्रीपाद
आगाशे साहेब, वेस्ट पासून बेस्ट करणारे निसर्ग प्रेमी विजयकुमार कट्टी साहेब ह्यांचे मान्यवरांचा हस्ते सेवा रत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
फक्त
महाराष्ट्रात व इतर राज्यातील हजारो रुग्णांना वैद्यकीय सहायता मदत केंद्राचे माध्यमातून गरजू रुग्णांना जीवदान देणारे देवदूत मंगेश दादा चिवटे ह्यांचा मुखातून माझ्या सारख्या सामान्य रक्तदात्यांचे उल्लेख वारंवार होणे हे माझ्या सारख्या रक्तदात्यांचे भाग्य, तसेच त्यांनी माझे लिम्का बुक ऑफ रेकॉर्ड, मध्ये नाव आणि प्रस्ताव पाठवण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे बोलून दाखवले ,त्याबद्दल मी चिवटे साहेबांचे आभारी आहे. आणि माझे सन्मान केल्या बद्दल डायसन फाऊंडेशन चे अध्यक्ष अतुल तारसिंग राठोड ह्यांचे आभारी आहे.