निवडणुकीच्या काळात १ पिस्टल व ०१ राऊंडसह आरोपी गुन्हे शाखा, युनिट ३ च्या ताब्यात..

0
Spread the love

उपसंपादक-उमेद सुतार

पुणे :- दि. ०५/११/२०२४ रोजी गुन्हे शाखा, यूनिट ३. पुणे कडील पोलीस अंमलदार ज्ञानेश्वर चित्ते यांना मिळाले बातमीवरून आरोपी नामे सौरभ अरुण मानकर वय. २३ वर्षे रा. मु. पो सांगरुण ता हवेली जि पुणे यास दिनांक ०५/११/२०२४ रोजी १८.५५ वा, स्मशानभुमी, सांगरुण गाव, ता. हवेली, जि. पुणे येथून ताब्यात घेवून त्याचेकडून एक पिस्टल व एक काडतुस काढून दिल्याने त्याचेविरूध्द उत्तमनगर पोलीस ठाणे गुन्हा रजि. नंबर १३५/२०२४ भारतीय हत्यार कायदा कलम ३(२५), महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम ३७ (१) सह १३५ प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

आरोपी सौरभ अरुण मानकर वय. २३ वर्षे रा. मु. पो सांगरुण ता हवेली जि पुणे याचेकडे केले तपासात त्याने सदरचे पिस्टल हे अभय छबन वायकर रा. सांगरुण ता. हवेली जि.पुणे याचेकडून घेतले असल्याचे सांगीतले असून अभय छबन वायकर यास देखील दाखल गुन्हयात आरोपी केला असून त्याचा शोध सुरू आहे. अभय छबन वायकर याचेवर यापूर्वी शस्त्र बाळगल्याचा गुन्हे नोंद आहेत.

तसेच सांगरूण, ता. हवेली, जि. पुणे या गावातील व परीसरातील नागरीकांना आवाहन करण्यात येत आहे की, कोणीही बेकायदा शस्त्रे बाळगू नयेत. त्याबाबत काही माहिती असल्यास गोपनियरित्या पोलीस विभागाला कळवावे.

सदरची कामगिरी ही, मा. पोलीस उप-आयुक्त, गुन्हे, श्री. निखील पिंगळे पुणे शहर मा. सहा. पोलीस आयुक्त, गुन्हे-१, श्री. गणेश इंगळे, पुणे शहर, यांचे मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा युनिट ३ चे प्रभारी अधिकारी, वरिष्ठ पोलीस निरीक्षक रंगराव पवार, सहायक पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर ढवळे, पोलीस हवा. शरद याकसे, विनोद भंडलकर, गणेश सुतार, पोलीस अंमलदार ज्ञानेश्वर चिते, गणेश शिंदे, हरिश गायकवाड, प्रतिक मोरे, राकेश टेकावडे, इसाक पठाण व सुजित पवार यांचे पथकाने केली आहे.

दाखल गुन्हयाचा पुढिल तपास मुकेश कुरेवाड, उत्तमनगर पोलीस ठाणे, पुणे शहर हे करीत आहेत.

ताजी बातमी व जाहिरातीसाठी संपर्कः
मोबा.नं. 9920601001
info@surakshapolicetimes.com
diptibhogal@surakshapolicetimes.com

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

रिसेंट पोस्ट