कोबींग ऑपरेशन दरम्यान २ देशी बनावटीची पिस्टल, ३ जिवंत काडतुसे, रिकामे मेंग्झीन, मोटार सायकल असा १,१५,६००/- रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त…

उपसंपादक- रणजित देशमुख
सातारा :-श्री. समीर शेख पोलीस अधीक्षक सातारा व श्रीमती आँचल दलाल अपर पोलीस अधीक्षक सातारा यांनी लोकसभा निवडणूक प्रक्रिया २०२४ चे अनुशंगाने दि.२५/०४/२०२४ रोजीचे २१.०० वा ते दि.२६/०४/२०२४ रोजीचे ०२.०० वा.चे दरम्यान सातारा जिल्हयात कोचींग ऑपरेशन राचवून पोलीस अभिलेखावरील आरोपी व अन्य संशईत इसमांना चेक करुन प्रभावी कार्यवाही करण्याच्या सुचना पोलीस निरीक्षक अरुण देवकर स्थानिक गुन्हे शाखा सातारा यांना दिल्या.
पोलीस निरीक्षक अरुण देवकर यांनी सहायक पोलीस निरीक्षक रोहित काणें यांचे अधिपत्याखाली स्थानिक गुन्हे शाखेकडील पोलीस अंमलदारांचे पथक तयार करुन त्यांना सातारा शहरामध्ये कोबींग ऑपरेशन ऑपरेशन राबविण्याच्या सुचना दिल्या.
सहायक पोलीस निरीक्षक रोहित फाणे व स्थानिक गुन्हे शाखेकडील पोलीस अंमलदार यांचे पथक सातारा शहरातील गेंडामाळ आकाशवाणी या ठिकाणी कोंचीग ऑपरेशन करीत असताना पोलीस निरीक्षक अरुण देवकर यांना त्यांचे विश्वसनीय बातमीदारामार्फत माहिती प्राप्त झाली की, सातारा शहरातील शाहुपूरी ते आदर्श कॉलनी जाणारे रस्त्यावर दोन इसम त्यांचे काळया रंगाचे होंडा अॅक्टीव्हा मोपेड क्रमांक एम.एच.१० ई एफ ७६०४ वरुन गावठी बनावटीचे पिस्टल विक्री करण्याकरीता येणार आहे, त्याप्रमाणे त्यांनी सदरची माहिती सहायक पोलीस निरीक्षक रोहित फाणे व त्यांचे पथकास देवून प्राप्त माहिती मधील इसमास ताब्यात घेवून पुढील कारवाई करण्याच्या सूचना दिल्या. पथकास सातारा शहरातील शाहूपूरी ते आदर्श कॉलनी जाणारे रस्यावरील निलगीरीच्या मोकळ्या मैदाना जवळ २३.०५ वा.च्या सुमारास काळ्या रंगाची होंडा अॅक्टीव्हा मोपेड क्रमांक एम.एच.१० ई एफ ७६०४ वरुन दोन इसम आदर्श कॉलनीकडून पंचपोर दवाखान्याकडे येताना दिसले, त्या इसमांना ताब्यात घेवून त्याची अंगइरडती घेतली असता त्याचे कब्जात १,९५,६००/- रुपये किमतीची २ देशी चनावटीची पिस्टल, ३ जिवंत काडतुसे, १ रिकामे मेंग्झीन व हिरो मोपेड असा मुद्देमाल मिळून आल्याने त्यांचे विरुध्द शाहूपुरी पोलीस ठाणे गु.र.नं.२०५/२०२४ भारतीय शस्त्र अधिनियम (सुधारीत २०१९) चे कलम ३. ७. २५ सह म.पो.अ.क.३७(१) (१), १३५ अन्वये गुन्हा नोंद केला आहे.
माहे नोव्हेंबर २०२२ पासून ८२ देशी बनावटीची पिस्टल, ३ बारा बोअर रायफल, ११४ जिवंत काडतुसे व ३७७ रिकाम्या पुंगळ्या जप्त करण्यात आले आहे. श्री. समीर शेख पोलीस अधीक्षक, सातारा व श्रीमती आँचल दलाल अपर पोलीस अधीक्षक सातारा यांचे
मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक अरुण देवकर, सहायक पोलीस निरीक्षक सुधीर पाटील, रोहित फार्णे, पृथ्वीराज ताटे, पोलीस उपनिरीक्षक विश्वास शिंगाडे, अमित पाटील, मदन फाळके, तानाजी माने, पोलीस अंमलदार अतिश घाडगे, संतोष सपकाळ, संजय शिर्के, विजय कांबळे, शरद बेबले, लैलेश फडतरे, लक्ष्मण जगधने, प्रचिण फडतरे, अमित इझेंडे, अरुण पाटील, अमित माने, अविनाश चव्हाण, गणेश कापरे, अमित सपकाळ, स्वप्नील कुंभार, अमित माने, मोहन पवार, ओंकार यादव, रोहित निकम, विशाल पवार, पृथ्वीराज जाधव, वैभव सावंत, सचिन ससाणे, मयूर देशमुख, प्रविण पवार, शिवाजी गुरव, विजय निकम यांनी सदरची कारवाई केलेली असून कारवाईत सहभागी अधिकारी व अंमलदार यांचे श्री. समीर शेख पोलीस अधीक्षक, सातारा व श्रीमती आँचल दलाल अपर पोलीस अधीक्षक सातारा यांनी अभिनंदन केलेले आहे.
ताजी बातमी व जाहिरातीसाठी संपर्कः
मोबा.नं. 9920601001
info@surakshapolicetimes.com
diptibhogal@surakshapolicetimes.com