कोबींग ऑपरेशन दरम्यान २ देशी ब पिस्टल, २ जिवंत काडतुसे व मोटार सायकल असा २,००,५००/- रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त..

0
Spread the love

उपसंपादक-रणजित मस्के

सातारा :-श्री. समीर शेख पोलीस अधीक्षक सातारा व श्रीमती आँचल दलाल अपर पोलीस अधीक्षक सातारा यांनी लोकसभा निवडणूक प्रक्रिया २०२४ चे अनुशंगाने दि.०४/०४/२०२४ रोजीचे २२.०० वा ते दि.०५/०४/२०२४ रोजीचे ०३.०० वा.चे दरम्यान सातारा जिल्हयात कोबींग ऑपरेशन राचवून पोलीस अभिलेखावरील आरोपी व अन्य संशईत इसमांना चेक करुन प्रभावी कार्यवाही करण्याच्या सुचना पोलीस निरीक्षक अरुण देवकर स्थानिक गुन्हे शाखा सातारा यांना दिल्या.

पोलीस निरीक्षक अरुण देवकर यांनी सहायक पोलीस निरीक्षक सुधीर पाटील यांचे अधिपत्याखाली स्थानिक गुन्हे शाखेकडील पोलीस अंमलदारांचे पथक तयार करुन त्यांना फलटण शहरातील सोमवारपेठ या ठिकाणी कोबींग ऑपरेशन ऑपरेशन राबविण्याच्या सूचना दिल्या.

सहायक पोलीस निरीक्षक सुधीर पाटील व स्थानिक गुन्हे शाखेकडील पोलीस अंमलदार यांचे पथक सोमवारपेठ फलटण या ठिकाणी कोंबीग ऑपरेशन करीत असताना पोलीस निरीक्षक अरुण देवकर यांना त्यांचे विश्वसनीय बातमीदारामार्फत माहिती प्राप्त झाली की, फलटण शहरातील मौजे अलगुडेवाडी हद्दीत बोरावके वस्ती जथळ फलटण ते बारामती जाणारे रस्त्याने एक इसम त्याचे लाल पांढऱ्या रंगाची मोपेड क्रमांक एम.एच.११ सी.एल २९९७ वरून गावठी बनावटीचे पिस्टल विक्री करण्याकरीता येणार आहे, त्याप्रमाणे त्यांनी सदरची माहिती सहायक पोलीस निरीक्षक सुधीर पाटील व त्यांचे पथकास देवून प्राप्त माहिती मधील इसमास ताब्यात घेवून पुढील कारवाई करण्याच्या सुचना दिल्या, पथकास अलगुडेवाडी हद्दीत बोरावके वस्ती जवळ २३.३० वा.च्या सुमारास फलटण ते बारामती रस्त्यावरुन प्राप्त माहितीमधील मोपेडयरुन एक इसम बारामती बाजूकडे जाताना दिसला, त्या इसमास ताब्यात घेवून त्याची अंगहाडती घेतली असता त्याचे कब्जात २,००,४००/- रुपये किमतीची २ देशी बनावटीची पिस्टल, २ जिवंत काडतुसे च हिरो मोपेड असा मुद्देमाल मिळून आल्याने त्यांचे विरुध्द फलटण शहर पोलीस ठाणे गु.र.नं.१८४/२०२४ आर्म अॅक्ट ३, ७, २५ सह म.पो.अ.क.३७(१), १३५ अन्वये गुन्हा नोंद केला आहे.

माहे नोव्हेंबर २०२२ पासून ७८ देशी बनावटीची पिस्टल, ३ बारा बोअर रायफल, १८५ जिवंत काडतुसे व ३७७ रिकाम्या पुंगळ्या जप्त करण्यात आले आहे.

श्री. समीर शेख पोलीस अधीक्षक, सातारा व श्रीमती आँचल दलाल अपर पोलीस अधीक्षक सातारा यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक अरुण देवकर, सहायक पोलीस निरीक्षक सुधीर पाटील, रोहित फाणे, पोलीस उपनिरीक्षक विश्वास शिंगाडे, अमित पाटील, मदन फाळके, तानाजी माने, पोलीस अंमलदार सुधीर बनकर, अतिश घाडगे, संजय शिके, विजय कांचळे, साबीर मुल्ला, सचिन साळुंखे, हसन तडवी, सनी आवटे, मुनीर मुल्ला, अजय जाधव, अमित इंझेंडे, मनोज जाधव, राजू कांबळे, धीरज महाडीक, मोहसिन मोमीन, अमृत कर्षे यांनी सदरची कारवाई केलेली असून कारवाईत सहभागी अधिकारी व अंमलदार यांचे बी. समीर शेख पोलीस अधीक्षक, सातारा व श्रीमती आँचल दलाल अपर पोलीस अधीक्षक सातारा यांनी अभिनंदन केलेले आहे.

ताजी बातमी व जाहिरातीसाठी संपर्कः
मोबा.नं. 9920601001
info@surakshapolicetimes.com
diptibhogal@surakshapolicetimes.com

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

रिसेंट पोस्ट