आचारसंहिता कालावधीत स्था. गुन्हे शाखेकडून वाई पोलीसांनी आरोपी स्वप्निल जगताप व गणेश राठोड यास दोन पिस्टल पिस्तुलासह ठोकल्या बेड्या..

0
WhatsApp Image 2024-06-07 at 7.39.13 AM
Spread the love

उपसंपादक – रणजित मस्के

वाई :-श्री. समीर शेख पोलीस अधीक्षक सातारा व श्रीमती औचल दलाल अपर पोलीस अधीक्षक यांनी लोकसभा निवडणूक प्रक्रिया २०२४ च्या अनुषंगाने आचारसंहिता कालावधीत बेकायदेशीर शस्त्रे व अग्नीशस्त्रे बाळगणा-या इसमांवर कारवाई करण्याच्या सुचना पोलीस निरीक्षक अरूण देवकर यांना दिलेल्या होत्या व त्यानुसार पोलीस निरीक्षक अरूण देवकर यांनी स्थानिक गुन्हे शाखेकडील अधिपत्याखालील सपोनि सुधीर पाटील व पोलीस अंमलदार यांचे पथक तयार केले होते.

मौजे परखंदी ता. वाई गांवचे हद्दीत एम.आय.डी.सी रस्त्यावरील चौकात दोन युवक पिस्टल खरेदी विक्री करण्याकरीता येणार आहेत अशी माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री. अरूण देवकर यांना खास बातमीदारामार्फत प्राप्त झालेली होती. त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे सहायक पोलीस निरीक्षक श्री. सुधीर पाटील व त्यांच्या अधिपत्त्याखाली असलेल्या पथकास पोलीस निरीक्षक श्री. अरूण देवकर यांनी सुचना देवून वाई एम.आय.डी.सी परिसरात पेट्रोलींग करून कारवाई करणेचाचत सुचना दिल्या.

दिनांक ०३/०६/२०२४ रोजी स्थानिक गुन्हे शाखेचे सहायक पोलीस निरीक्षक सुधीर पाटील व त्यांच्या अधिपत्त्याखाली असलेल्या पथकाने वाई एम.आ.डी.सी. परिसरात पेट्रोलिंग करीत असताना मिळाले बातमी मधील वर्णनाप्रमाणे एक युक्क मिळाले बातमीचे ठिकाणाजवळ झाडाखाली त्याचे मोटारसायकलसह चांवलेला दिसला त्याचेकडे दुसरा युवक रस्त्याने चालत येताना दिसला दोन्ही युवक एकमेकांचे जवळ येवून बोलत असताना पचकास शंका आलेने त्यांना जागीच पकडून त्यांना ताब्यात घेतले असता त्यांचे कब्जात २ देशी बनावटीची पिस्टल, २ काडतूस, ५५०० रू. रोख रक्कम, २ मोबाईल व एक दुचाकी मोटार सायकल असा एकुण रु२,५५,९००/- चा मुद्देमाल ताब्यात मिळून आलेने त्या दोन्ही युवकाविरुध्द वाई पोलीस ठाणेत शस्वबंदी कायदयाप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.

सातारा पोलीस दलाकडून माहे नोव्हेंबर २०२२ पासून ते आजपोवेतो ८९ देशी बनावटीची पिस्टल, ३ बारा बोअर बंदूक, १ रायफल, १९९ जिवंत काडतुसे, व ३८५ रिकाम्या पुंगळ्या, १ रिकामे मॅग्झीन असे जप्त करण्यात आलेले आहेत.

सदर कारवाई मध्ये श्री. समीर शेख पोलीस अधीक्षक सातारा व श्रीमती आँचल दलाल अपर पोलीस अधीक्षक सातारा, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अरूण देवकर, यांचे मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखोचे स.पो.नि. सुधीर पाटील, पृथ्वीराज ताटे, रोहित फाणे, पोडनि, विश्वास शिंगाडे, सहा. पोलीस उपनिरीक्षक सुधीर बनकर, पो.हवा. सचिन साळुंखे, साबीर मुल्ला, मंगेश महाडीक, सनी आवटे, मुनिर मुल्ला, अमित झेंडे, अजय जाधव, हसन तडवी, राजू कांबळे, मनोज जाधव, पृथ्वीराज जाधव, धिरज महाडीक, मोहसीन मोमीन, पंकज बेसके, अमृत करपे, दलजितसिंह जगदाळे, विजय निकम, यांनी सहभाग घेतला.

अशा प्रकारे लोकसभा निवडणूक आचारसंहिता कालावधीत केलेल्या उत्कृष्ट कारवाईचाचत सहभागी अधिकारी व अंमलदार यांचे श्री. समीर शेख पोलीस अधीक्षक सातारा, श्रीमती आँचल दलाल अपर पोलीस अधीक्षक सातारा व श्री. अतुल सबनीस, पोलीस उप अधीक्षक, सातारा यांनी अभिनंदन केले.आरोपींची नावे

१) स्वप्नील उर्फ सोन्या प्रदिप जगताप वय २६ वर्षे रा. सुलतानपुर ता. वाई जि.सातारा.

२) गणेश कमल राठोड वय २५ वर्षे रा. सोनवडी ता. दौन्ड जि.पुणे

ताजी बातमी व जाहिरातीसाठी संपर्कः
मोबा.नं. 9920601001
info@surakshapolicetimes.com
diptibhogal@surakshapolicetimes.com

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

रिसेंट पोस्ट