शिरवळ पोलीसानी पेट्रोलिग दरम्यान १ देशी बनावटीचे पिस्टल, २ जिवंत काडतुसे व मोटार सायकल असा १,२०,४००/- रु किमतीचा मुददेमाल जप्त..

उपसंपादक-रणजित मस्के
सातारा :-श्री. समीर शेख पोलीस अधिक्षक सातारा व श्रीमती ऑचल दलाल अप्पर पोलीस अधिक्षम सातारा तसेच श्री. राहुल धस उपविभागीय पोलीस अधिकारी फलटण विभाग फलटण यांनी लोकसभा निवडणुक प्रक्रिया २०२४ चे अनुशंगाने पोलीस ठाणे हददीत सक्त पेट्रालिगचे करण्याबाचतचे सुचना देण्यात आलेल्या होत्या.
पोलीस निरीक्षक संदीप जगताप, पोलीस उप-निरीक्षक सतीश आंदेलवार व पोलीस ठाणेचे अंमलदार असे शिरवळ पोलीस ठाणे हददीत पेट्रोलिम करीत असताना पोलीस निरीक्षक संदीप जगताप यांना त्यांचे विश्वसनीय बातमीदारामार्फत माहिती प्राप्त इगली की, शिरवळ गावचे हददीत पळशी रोडला दोन संशयित इसम धनलक्ष्मी रेसिडेंटच्या पाींग आवारात संशयीतरित्या फिरत आहेत. अशी माहिती प्राप्त झालेमै शिरवळ पोलीस ठाणे स्टाफसह मिळाले बातमीचे ठिकाणी पोहचले, त्यावेळी तेथे होन्दा यूनिकॉर्न मो.सा.क्र. एम.एच.०२ डी.डी.५९३० या गाडीवर बसून होते. त्या इसमांची हालचाल संशयास्पद जाणविल्याने त्यास त्याचे नाव, गाव विचारले असता त्यांनी उड़या उडवीची उत्तरे दिली. त्याचे हावभाव प हालचाली संशयास्पद वाटुन त्याचे जवळ असले कापडी पिशवी दिसुन आली तेव्हा त्या पिशवीची पाहणी पेली असता त्या मध्ये १ लोखंडी स्टीलचे गावठी बनावटीचे पिस्टल, २ जिवंत काडतुसे च । मोटार सायकान असे सुमारे १,२०,४००/- रु किमतीचा मुददेमाल मिळुन आल्याने त्यांचे विरुदध शिरवळ पोलीस ठाणे १३७/२०२४ शस्व अधि. १९५९ चे कलम ३(१),७,२५ प्रमाणे गुन्हा नोद केला आहे.
माहे नोव्हेंबर २०२२ पासून ८० देशी बनावटीची पिस्टल, ३ बारा बोअर रायफल, १८७ जिवंत काडतुसे व ३७७ रिकाम्या पुंगळ्या जप्त करण्यात आले आहे.
श्री. समीर शेख पोलीस अधिक्षक सातारा, श्रीमती आँचल दलाल अप्पर पोलीस अधिक्षक सातारा यांचे मार्गदर्शनाखाली श्री. राहुल धस उपविभागीय पोलीस अधिकारी फलटण विभाग फलटण यांचे सूचनाप्रमाणे पोलीस निरीक्षक संदीप जगताप, पोलीस उप-निरीक्षक सतीश आंदेलवार, शंकर पांगारे, सहा. पोलीस फौजदार पावरा, पो. हया, मचिन धीर, जितेंद्र शिंदे, प्रशांत धुमाळ, पो.कॉ. मंगेश मोद्वार, सुरज चव्हाण यांनी सदरची कारवाई केलेली असुन कारवाईत सहभागी अधिकारी व अंमलदार यांचे श्री. समीर शेख पोलीस अधिक्षक, सातारा, श्रीमती आँचल दलाल अप्पर पोलीस अधिक्षक सातारा व श्री. राहुल धस उपविभागीय पोलीस अधिकारी फलटण विभाग फलटण यांनी अभिनदंन केले आहे.
आरोपीची नावे
१) दिपक संतोष पाटणे वय-२२ वर्षे, रा. चिंग ता.खंडाळा, जि. सातारा
२) ओम सतिष कदम यय-१९ वर्षे, रा. लोणी ता. खंडाळा, जि. सातारा
ताजी बातमी व जाहिरातीसाठी संपर्कः
मोबा.नं. 9920601001
info@surakshapolicetimes.com
diptibhogal@surakshapolicetimes.com