उसने दिलेल्या 60 रुपयाच्या क्षूल्लक कारणावरून मित्रानेच मित्राचा गळा आवळून केला खून-आरोपी दवनिवाडा पोलीसांच्या ताब्यात. ..

0
Spread the love

उपसंपादक-रणजित मस्के

गोंदिया :

🔹क्षुल्लक कारणावरून दिवसेंदिवस हाणामारीच्या घटणा घडत असल्याचे आणि त्यातून गंभीर खुनासारखे प्रकारसुध्दा घडल्याचे आपण ऐकत आलो आहे. अशीच एक घटना दवनीवाडा पोलीस ठाणे अंतर्गत ग्राम- बोदा येथे दिनांक 08-10- 2023 दुपारी घडलेली आहे. ज्यात क्षुल्लक कारणावरून मित्रानेच मित्राचा गळा आवळून खून केला आहे.

🔹सदर प्रकरणाबाबत थोडक्यात हकीगत अशी आहे की, आरोपी नामे- अल्पेश कुवरलाल पटले राहणार - हुडकाटोला, बोदा तालुका- तिरोडा, जिल्हा गोंदिया याने त्याचा मृतक मित्र नामे- आकाश लक्ष्मण दानवे वय 20 वर्ष राहणार- बोदा याला उसने घेतलेले 60 रुपये परत देण्याची मागणी केली. यावर मृतक मित्राने सांगितले, की पैसे सायंकाळी फोन- पे ने पाठवतो. त्यावर आरोपी अल्पेश पटले याचा त्याचेवर विश्वास बसला नाही, त्यामुळे त्या दोघांमध्ये बाचाबाची झाली. त्यात आरोपी अल्पेश पटले याने  आकाश लक्ष्मण दानवे याचा गळा आवळून तुला खतम करतो असे म्हणून त्यास खाली जमिनीवर पाडून छातीवर डाव्या हाताने जोराने बुक्का मारला त्यात आकाश हा बेशुद्ध झाला त्यानंतर लगेचच आकाशला प्राथमिक आरोग्य केंद्र दवनीवाडा येथे हलविण्यात आले तिथून त्याला पुढे उपजिल्हा रुग्णालय तिरोडा येथे हलविण्यात आले. परंतु तेथील वैद्यकीय अधिकारी यांना त्यास मृत घोषीत केले. यावरून फिर्यादी विजेश पतिराम दानवे राहणार बोदा यांचे तक्रारी वरून पोलीस ठाणें दवनीवाडा येथे अपराध क्रमांक 272/2023 कलम 302 भादंवि अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला. 

          सदर प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन ठाणेदार पो. नि. सतिश जाधव यांनी मा. वरिष्ठांना सदर घटनेच्या अनुषंगाने माहिती देवुन मा. वरिष्ठांचे निर्देश सूचना मार्गदर्शनाखाली दवनीवाडा पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी पोहोचून घडलेल्या खून प्रकरणाची, मयत इसम, आरोपी, ईत्यादी बाबत संपुर्ण माहिती प्राप्त करून    गुन्ह्यातील आरोपी ईसम नामे - अल्पेश कुंवरलाल पटले वय 21 वर्षे राहणार- हुडकाटोला, बोदा याचा तात्काळ शोध घेवुन त्यास गुन्ह्यात अटक करण्यात आलेली आहे. 

     मा. वरिष्ठांचे निर्देश, सूचना व मार्गदर्शनाखाली सदर गुन्ह्याचा तपास पोलिस निरीक्षक श्री. सतिश जाधव पो. ठाणे दवनीवाडा हे करीत आहेत.

ताजी बातमी व जाहिरातीसाठी संपर्कः
मोबा.नं. 9920601001
info@surakshapolicetimes.com
diptibhogal@surakshapolicetimes.com

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

रिसेंट पोस्ट