किल्लेदार डीवायएसपी यांच्या पुढाकाराने नंदगिरीच्या किल्ल्याचा झाला स्वच्छतेने कायापालट…

उपसंपादक – रणजित मस्के
नांदेड :– शेकडो गडप्रेमी तरुणांनाचे मोहिमेत योगदान किल्ल्यात आजपासून पोलिसांचे शस्त्र प्रदर्शन तीस हजाराहून अधिक शाळकरी मुले, मुली भेट देणार
करोडो रुपये खर्जूनही अवकळा आलेल्या व ऐतिहासिक महत्व असलेल्या जुन्या शहरातील नंदगिरी किल्याला गतवैभव मिळवून देण्यासाठी शेकडो हात झटत असल्याचे आशादायी चित्र दिसून आले असून, या गडावर स्वच्छतेची पताका रोवणारे पोलीस उपअधीक्षक सुरज गुरव हे खऱ्या अर्थाने सध्या तरी नंदगिरीचे किल्लेदार म्हणून जनतेत संबोधले जात आहेत.


गेल्या चार महिन्यांपासून फावडे, घमेले व कोयते हातात पेवून या मंडळीने किल्ल्यावरील कमरे एवढे वाढलेली झाडे झुडपे काढून हा संपूर्ण किल्ला स्वच्छ केला आहे. हा ऐतिहासिक वारसा जिवंत राहावा आणि पुढच्या पिढीने त्यातून प्रेरणा घ्यावी, असा या मागचा हेतू असून, सुरज गुरव यांनी सुरू केलेली ही चळवळ न थांबता अनेकांनी किल्लेदार म्हणून पुढे येण्याची गरज आहे. दरम्यान, एवढ्यावर न थांबता या किल्याची माहिती विद्यार्थ्यांना व्हावी यासाठी २१ व २२ डिसेंबर रोजी पोलीस दलाच्या शस्त्रांचे प्रदर्शन येथे ठेवण्यात आले आहे.

तोफ ओट्यावर किल्ला परिसरातील तोफ अस्ताव्यस्त पडलेली होती, हा सचित्र देखाया अनेक वेळा जगजाहीर झाला होता. या तोफेचा ओटा सुद्धा नामशेष झाला होता, चार टन वजनाची ही तोफ गडप्रेमी तरुणांनी विनाकेन उचलून ओट्यावर सुस्थितीत बसविली आहे. तोफेसाठी मजबूत ओटा बांधून त्यावर ती बसविण्यात आली आहे. एकीचे बळ चार टन वजनाच्या तोफेपेक्षा कितीतरी अधिक पट असते हेच त्यास्वती झटलेल्या हातांनी सिद्ध केले आहे.पहिल्यादांच गडावर शस्त्रांचे प्रदर्शन पोलीस दलाच्या शस्त्राचे प्रदर्शन नेहमी भरविले जात असले तरी, या प्रदर्शनाच्या निमित्ताने नांदेडचे वेगळेपण दिसून येणार आहे. नंदगिरी किल्ल्याच्या स्वच्छतेची मोहीम हाती घेवून पोलीस उपअधीक्षक सुरज गुरव यांनी ‘केलयाने होत आहे रे याची प्रचिती आणून देताना नवीन संकल्पना पुढे आणली. पोलीस दलाच्या शस्त्रांचे प्रदर्शन नंदगिरी किल्ल्यावर भरवून त्यांनी शालेय विद्यार्थ्यांना या किल्लाची माहिती व्हायी, गडाचा त्यांना अभयास व्हावा याचा प्रवास केला आहे.
ताजी बातमी व जाहिरातीसाठी संपर्कः
मोबा.नं. 9920601001
info@surakshapolicetimes.com
diptibhogal@surakshapolicetimes.com