सिंहगड रस्ता पोलिसांच्या समुपदेशनामुळे उच्च शिक्षित नवदाम्पत्याचा संसार सुखी…

0
Spread the love

उपसंपादक-रणजित मस्के

पुणे:-पोलिसांकडून महाबळेश्वर सहलीचे पॅकेज

पुणे: संसार म्हटले की भांड्याला भांडे लागणे आलेच. त्याच प्रमाणे नवरा बायकोची ही भांडणे होतच असतात. समजून घेतले तर संसारचा गाडा पुढे जातो. अन्यथा वाद विकोपाला गेले तर संसार अर्ध्यावरच तुटतो.

संसार म्हटले की भांड्याला भांडे लागणे आलेच. त्याच प्रमाणे नवरा बायकोची ही भांडणे होतच असतात. समजून घेतले तर संसारचा गाडा पुढे जातो. अन्यथा वाद विकोपाला गेले तर संसार अर्ध्यावरच तुटतो. उच्च शिक्षित आहात, एकमेकांना समजून घेत दोघांच्या आई वडिलांचा मान ठेवून त्यांच्या आशीर्वादाने पुन्हा हसत खेळत संसार करा, असे समुपदेशन करुन सिंहगड पोलिसांनी गुरुवारी पु्ण्यातील एका उच्च शिक्षित नवदाम्पत्याचा वाद मिटवला पत्नीने तिच्या कमाईचे पैसे तिच्या आई वडिलांना देऊ नयेत. वडिलांच्या घराच्या कर्जामध्ये सहभागीदार राहू नये. तुझे पैसे आता सगळे आमचे आहेत. असे सांगून पती पत्नीशी दरदरोज भांडण करत असे. यातून त्याने त्याच्या पत्नीला मारहाण देखील केली. रात्री अपरात्री पतीकडून पत्नीला त्रास दिला जात होता. या त्रासाला कंटाळून अखेर पत्नीने पतीच्या विरोधात सिंहगड पोलीस ठाणे अंकीत वडगाव बुद्रक पोलीस चौकीमध्ये तक्रार अर्ज दाखल केला. त्याची दखल घेत वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय कुंभार आणि पोलीस निरीक्षक सुरेश जायभाय यांनी या दाम्पत्याचे समुपदेशन केले.

नोव्हेंबर २०२३ मध्ये ते दोघे विवाह बंधनात अडकले. त्यानंतर त्यांचा सुखी संसार सुरु झाला. दोघेही आनंदाने एकत्र राहत होते. फिरायला जाणे, पाहुण्यांकडे जाणे- येणे त्यांचे सुरु होते. दोघांच्याही सासरचे लोक खुश होते. गेल्या दीड महिन्यापूर्वी कुटुंबासह हैद्राबादला सहलीचा आनंद लुटला. त्यावेळी ते दोघेही खुप खुश होते. मात्र पत्नीचा पगार झाल्यानंतर दोन ते तीन दिवसांनी पतीने पत्नीचे खाते तपासले. तसेच ऑनलाईन व्यवहार तपासले. यामध्ये पत्नीने तिच्या आई वडिलांना दर महिन्याला २० हजार रुपये दिल्याचे दिसून आले. त्यामुळे पतीला राग आला. याच रागातून त्याने पत्नीला त्रास देणे सुरु केले.

पत्नीला मारहाण करणे, तिच्या आईवडिलांना आर्वाच्च भाषेत शिव्या देणे, मेहुण्याला मारहाण करण्याची धमकी देणे. तिच्या मोठ्या बहिणासोबत वाद घालून वाईट बोलणे, असे प्रकार पतीकडून होऊ लागले. नवरा बायकोची भांडणे होत असतात त्यामुळे त्याकडे लक्ष देऊ नका. असे सासु सासऱ्यांनी सुनेला समजावले तसेच त्यांच्या मुलाला देखील सांगितले. त्यावर पतीने ”तुला काय करायचे आहे, ते कर”, पैसे तु तु्झ्या आई वडिलांना दिलेस तरी माझी हरकत नाही.” असे सांगून झालेल्या वादावर पडदा टाकला. मात्र त्यानंतर काही दिवसांनी पुन्हा पतीने पत्नीच्या मोबाईलची तपासणी सुरु केली. आई, बहिणीसोबत तसेच भावा सोबत काय बोलली याची माहिती विचारु लागला. त्यानंतर पत्नी त्याला सर्व काही सांगत होती. मात्र तु हे सांगितलेले आणि प्रत्यक्षात फोनवर बोलल्याची वेळ यामध्ये फरक आहे. त्यामुळे तुम्ही काय-काय बोलता हे मला समजले पाहिजे असा हट्ट् धरला. त्यातून पुन्हा वादाला सुरुवात झाली. यातून पुन्हा मारहाण केल्याने पत्नीने थेट पोलिसांकडे धाव घेतली. असे तिने तक्रार अर्जात नमूद केले आहे.

लग्नानंतर पती पत्नीने समजूतीने संसार केला पाहिजे. दोघेही उच्च शिक्षित असून वाद घालणे चुकीचे आहे. आजच्या आधुनिक युगानुसार विचार केला पाहिजे. लग्नानंतर मुलीने आईवडिलांना मदत करणे चुकीचे नाही. त्यामुळे पैशांवर असलेल्या वादावर मार्ग सुचवण्यात आला आहे. दोघांच्याही आईवडिलांना समजावले आहे. नवीन संसार असल्याने वाद होत असतात पण यातून मारहाण करणे हे चुकीचे आहे. दोघांचा संसार तुटू नये, एकमेकांना समजून घेत पुन्हा नव्याने संसार सुरु करावा. असे सांगून समजूत काढली आहे. आता दोघांमध्ये कोणतेही वाद नाहीत. पुन्हा पत्नीला मारहाण केल्यास पतीवर कायदेशीर कारवाई करावी लागेल. पतीला किंवा पत्नीला या दोघांनाही एकमेकांच्या आईवडिलांपासून दूर ठेवण्याचा अधिकार नाही.

विजय कुंभार, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, सिंहगड पोलीस ठाणे.

नवरा बायकोमध्ये वाद होत असतात. हे त्या दोघांना समजावून सांगितले आहे. नवीन संसार असल्याने एकमेकांना समजून घेण्यास वेळ लागतो. पती पत्नीच्या वादाच्या अनेक तक्रारी पोलिसांकडे येत असतात. सुरुवातीला दोघांचेही समुपदेशन केले जाते. त्यानंतर मात्र काही चुकीचे घडले तर कायदेशीर कारवाई केली जाते. या प्रकरणात दोघेही उच्च शिक्षित असून त्यांचे आईवडिल शिकलेले आहेत. त्यांची समजूत घातली असून एकमेकांना वेळ मिळावा, यासाठी पोलिसांकडून त्यांना महाबळेश्वर सहलीचे पॅकेज दिले जाणार आहे.

सुरेश जायभाय, पोलीस उपनिरीक्षक, सिंहगड पोलीस ठाणे.

पतीच्या वाढदिवसाचा केक कापून तोंड केले गोड

पत्नीने पतीचा ४ एप्रिल रोजी वाढदिवस असल्याने त्याला गिफ्ट घेतले होते. परंतु त्यांच्यात वाद झाल्याने ती तिच्या आई वडिलांकडे आली होती. तसेच ते एकमेकांशी बोलत नव्हते. ऐन वाढदिवासाच्या दिवशीच पतीला पोलीस ठाणे बघावे लागले. मात्र पतीसाठी गिफ्ट घेतले आहे. त्याचा आज वाढदिवस आहे, असे सांगितल्यानंतर तत्काळ वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय कुंभार यांनी त्याच्यासाठी केक मागवला. दोघांचे वाद मिटवून पतीच्या वाढदिवसाचा केक कापून एकमेकांना भरवण्यास सांगितला. त्यांच्या वादाचा शेवड गोड झाल्याने पोलीस चौकीतील वातावरण निवळले.

ताजी बातमी व जाहिरातीसाठी संपर्कः
मोबा.नं. 9920601001
info@surakshapolicetimes.com
diptibhogal@surakshapolicetimes.com

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

रिसेंट पोस्ट