मोरेगांव गोपाळ निवास येथे ऐन पावसाळ्यात पडलेले झाड मा. नगरसेवक श्री. किशोर पाटील यांच्या प्रयत्नातून साफ केल्यामुळे नागरीकांनी मानले आभार..

प्रतिनिधी- मनोहर आगोंडे
नालासोपारा :-गेल्या काही दिवसात जो पाऊस पडला होता, त्यात मोरेगाव नालासोपारा (पूर्व) गोपाळ निवास येथे एक झाड पडले होते.
परंतु कोणतीही जीवितहानी झाली नाही तर येथील समाजसेवक ईश्वर सुतार साहेब यांनी आपल्या विभागातील कार्यरत नगरसेवक श्री. किशोर नाना पाटील साहेब यांच्याकडे तक्रार केली असता ताबडतोब महानगरपालिकेतील कर्मचाऱ्यांना आदेश दिले आणि ताबडतोब महानगर पालिका यांनी वसई विरार शहर फायरब्रिगेड यांना कळवून झाड कापण्यातआले आहे.

तरी विभागातील सर्व रहिवाशांनी कार्यसम्राट नगरसेवक श्री किशोर नाना पाटील साहेब (उद्धव बाळासाहेब ठाकरे गठ) आणि फायरब्रिगेड व महानगर पालिका कर्मचारी यांचे मनापासून आभार मानले आहेत.
ताजी बातमी व जाहिरातीसाठी संपर्कः
मोबा.नं. 9920601001
info@surakshapolicetimes.com
diptibhogal@surakshapolicetimes.com