स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा, सांगली यांची कारवाई परराज्यातील बॅग लिफ्टींग करणाऱ्या आरोपीस आंध्रप्रदेश येथून अटक..

उपसंपादक-रणजित मस्के
सांगली :- पोलीस स्टेशन
फिर्यादी नाव
मु.र.नं. २९४/२०२४ भा. दं. सं. कलम ३७९ प्रमाणे
शामराव महादेव कोळेकर, चय ६० वर्षे, रा आरेवाडी, ता कवठेमहांकाळ
कवठेमहांकाळ पोलीस ठाणे
गु.प.ता वेळ दि. २९/०६/२०२४ रोजी सकाळी ११.०० वा.
मु.दा.ता वेळ
दि. २९/०६/२०२४ रोजी १८.३५
माहिती कशी प्राप्त झाली पोह १८८१/ सागर लवटे
कारवाई करणारे अधिकारी आणि अंमलदार
मा. पोलीस अधीक्षक संदीप घुगे
मा. अपर पोलीस अधीक्षक रितु खोखर यांचे मार्गदर्शानाखाली पोलीस निरीक्षक सतिश शिंदे, स्था. गु. अ. शाखा, सहा पोलीस निरीक्षक पंकज पवार, पोहेकों / सागर लवटे, दऱ्याप्पा बंडगर, सागर टिंगरे, संदिप नलावडे, अमर नरळे, अनिल कोळेकर उदय माळी, सायबर पोलीस ठाणेकडील कॅप्टन गुंडवाडे
अटक दिनांक दि. ११/१०/२०२४
रोजी आरोपीचे नांव पत्ता
सलमान शंकरख्या चल्ला, वय ५२ वर्षे, रा कपरालथिप्पा, बिटरगुंड्रा, ता कवाली, जि नेल्लोर,
राज्य आंध्रप्रदेश जप्त मुद्देमाल
१. ५,२५,०००/- रु. ५००/-रूपये दराच्या १०५० भारतीय चलनी नोटा
५,२५,०००/- (पाच लाख पंचवीस हजार रूपये मात्र)
गुन्हयाची थोडक्यात हकीकत-
कवठेमहांकाळ येथील दि. २६/०६/२०२४ रोजी एस. बी. आय. बँकेमधून फिर्यादी हे १० लाख रोख रक्कम काढून वायरचे पिशवीत ठेवून ती पिशवी त्यांचेकडे असलेल्या स्कुटीच्या मध्य हुकाला अडकवून दोन्ही पायाच्या मध्ये येईल अशी अडकवली व ते त्यांचे घरी जात असताना एका अनोळखी इसमाने त्यांना तुमच्या खिशातील पैसे पडले आहेत व ते फिर्यादी गोळा करीत असताना फिर्यादीचे स्कुटीच्या हुकाला अडकवलेल्या वायरच्या पिशवीत असलेले १० लाख रोख रक्कम चोरून नेली. वगैरे गुन्हा नोंद आहे.
सदर गुन्हा उघडकिस आणणेबाबत मा. पोलीस अधीक्षक संदीप घुगे यांनी सुचना दिल्या.
सदर सुचनेप्रमाणे पोलीस निरीक्षक सतिश शिंदे, स्था. गु. अ. शाखा यांनी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेकडील सहा पोलीस निरीक्षक पंकज पवार व स्टाफ यांचे एक पथक तयार करून सदरचा गुन्हा उघडकीस आणणेबाबत आदेशीत केले होते.
.त्या अनुषंगाने दि. ०६/१०/२०२४ रोजी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेकडील सहा पोलीस निरीक्षक पंकज पवार यांचे पथकामधील पोहेकों / सागर लवटे यांना त्यांचे बातमीदाराकडून माहिती मिळाली की, कवठेमहांकाळ येथील एस. बी. आय. बैंक शाखेच्या बाहेर बॅग लिफ्टींग झालेल्या गुन्हयातील आरोपी हे आंध्र प्रदेश येथील बिटरगुंडा पोलीस ठाणे हद्दीतील आहे. अशी खात्रीशीर बातमी मिळाली.
नमुद मिळाले बातमीप्रमाणे, सहा. पोलीस निरीक्षक, पंकज पवार यांचे पथक हे आंध्रप्रदेश येथील
बिटरगुंडा पोलीस ठाणे येथे जावून स्थानिक बातमीदार तयार करून सदर चोरीतील आरोपी हा नेल्लोर जिल्हयातील कपरालथिप्पा, बिटरगुंडा येथे असल्याची बातमी मिळाल्याने बातमीप्रमाणे सदर ठिकाणी जावून निगराणी करून इसमास पळून जाण्याची संधी न देता त्यास ताब्यात घेवून त्याचे नाव गाव विचारता त्याने त्याचे नाव सलमान शंकरय्या चल्ला, यय ५२ वर्षे, रा कपरालथिप्पा, बिटरगुंद्रा, ता कवाली, जि नेल्लोर, राज्य आंध्रप्रदेश असे असलेचे सांगितले. सहा पोलीस निरीक्षक पंकज पवार यांनी त्यास दि. २९/०६/२०२४ रोजी कवठेमहांकाळ मध्ये एस. बी. आय. बैंक शाखेच्या बाहेर बेंग लिफ्टींग बाबत विचारणा केली असता त्याने सदरचा गुन्हा केला असल्याची कबुली दिली. तसेच सदर गुन्हयातील चोरीस गेलेल्या रकमेपैकी ५,२५,०००/-रु. रोख रक्कम काढून दिली. लागलीच त्याचे कब्जातील रोख रक्कम पुढील तपास कामी सहा पोलीस निरीक्षक पंकज पवार यांनी पंचासमक्ष जप्त केली. सदरचा गुन्हा कोणताही तांत्रिक पुराया नसताना परराज्यात जावून गोपनीय बातमीदार तयार करून गुन्हा उघडकिस आणला आहे.
सदर आरोपी व जप्त मुद्देमाल पुढील तपास कामी कवठेमहांकाळ पोलीस ठाणेकडे वर्ग करण्यात आला असुन पुढील तपास कवठेमहांकाळ पोलीस ठाणे करीत आहेत.
ताजी बातमी व जाहिरातीसाठी संपर्कः
मोबा.नं. 9920601001
info@surakshapolicetimes.com
diptibhogal@surakshapolicetimes.com