ठेकेदार व प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे लाडवली पूलाचे काम रखडले…

उपसंपादक – राकेश देशमुख
महाड :-संतप्त नागरिकांचा रास्ता रोको. ठेकेदारावर गुन्हा दाखल करण्याची मागणी.
रायगड किल्ला सह ४० गावांचा संपर्क तुटणार. महाड ते किल्ले रायगड मार्गाला महामार्गाचा दर्जा देऊ त्याचे रुंदीकरण व कॉंक्रीट करणाचे काम सुरू होऊन आज चार वर्षे झाली तरी अद्याप हा मार्ग पुर्ण होऊ शकला नाही. तर या मार्गावरी लाडवली पूलाचे काम रखडले असून पावसाळा सुरु झाला तरी पूलाचे काम झाले नसल्याने किल्ले रायगड सह या विभागाती २५ गावे व शळा, महाविद्यालयांचा संपर्क तुटणार आहे. आज संतप्त नागरीकांनी रास्तारोको करत ठेकेदार व महामार्ग अधिकार्यांवर गुन्हे दाखल करण्याची मागणी केली.





किल्ले रायगड मार्गाचे काम वादाच्या भोवऱ्यात सापडले असून मंजूरी नंतर गेल्या चार वर्षात दोन ठेकदार बदलून ही या मार्गाचे काम पुर्ण झालेले नाही. महत्वाची बाब म्हणजे या मार्गावरील लाडवली पूल आहे. हाच पूल या विभागाला जगाशी जोडून ठेवतो. सदर जुना पूल हा १९७४ साली बांधण्यात आला होता. उंची वाढविने व रुंदीकरणासाठी हा जुना पूल पाढणे आवश्यक होते मात्र पाडण्याची प्रक्रिया डिसेंबर मध्ये व्हायला हवी होती मात्र तसे न करता हा पूल मार्च मध्ये पाढण्यात आला. त्यामुळे पुढील कामासाठी कमी दिवस शिल्लक राहीले. त्यात संपुर्ण एप्रिल व मे महिणा या पूलाचे काम शंभर टक्के बंद होते. कोकणात ७ जुनला मानसुन सक्रिय होतो हे माहित असताना देखील महामार्ग अधिकार्यांनी या गोष्टी कडे दुर्लक्ष केले. परिस्थिती चे गांभीर्याने नसलेल्या या अधिकारी आणि ठेकेदाराला आता जाग आली आणि भर पावसात पूलाचे गर्डर हलवण्यास सुरवात केली मात्र पाऊस आणि चिखला मुळे मशनरी व यंत्रणा फसू लागल्याने आता या पूलाचे काम पुर्ण होणार नसल्याचे दिसल्याने येथील नागरीकांनी आज सोमवारी रास्तारोको आंदोलन केले. दरम्यान या गांधारी उपनदीचे पात्र अडवून ठेवल्याने सदर पात्र अचानक प्रवाहीत झाल्यास मोठी दुर्घटना होऊ शकते. सदर पूलाचे काम मिल्ट्री कींवा एनडीआरएफ कडून करुन घेण्याची मागणी होत आहे. तसेच हलगर्जीपणा करुन लोकांच्या जिवीतास धोका निर्माण केल्या प्रकरणी व किल्ले रायगड सह विभागाचा संपर्क तोडल्या मुळे आपत्ती व्यवस्थापन अंदर्गत ठेकेदार अक्षय कन्स्ट्रक्शन व महामार्ग विभाग अधिरींवर गुन्हा दाखल करण्याची मागणी करीत तक्रार दाखल करण्यात आली आहे. सदर आंदोलनाचे नेतृत्व भाजपा जिल्हा सरचिटणीस बिपीन महामुणकर, ता सरचिटणीस महेश शिंदे, शिवसेना महाड तालुका संपर्क प्रमुख रविंद्र(बंधु) तरडे, उबाठाचे तालुकाध्यक्ष राजु कोरपे यांनी केले.
ताजी बातमी व जाहिरातीसाठी संपर्कः
मोबा.नं. 9920601001
info@surakshapolicetimes.com
diptibhogal@surakshapolicetimes.com