ग्रामसुरक्षा यंत्रणेच्या तात्काळ व प्रभावी वापरामुळे हत्यार बंद आरोपी जेरबंद…

0
Spread the love

उपसंपादक-रणजित मस्के

सातारा :-रविवार 12/11/2023 रोजी उंब्रज पोलीस स्टेशन ता.कराड, जिल्हा_ सातारा पोलीस स्टेशन हद्दीमध्ये पाटणकडून पिकअप गाडीमध्ये हत्यारबंद संशयित आरोपी तीन-चार गाड्या उडून चोरे गावाच्या दिशेने येत असल्याची माहिती मिळताच,उंब्रज पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री प्रशांत बधे साहेब यांनी घटनेचे गांभीर्य लक्षात घेता,तात्काळ ग्राम सुरक्षा यंत्रणेद्वारे (18002703600) हद्दीतील सर्व पोलीस पाटील यांना सदर अडवण्यासाठी रस्त्यावरती ट्रेलर आडवे लावण्यासंबंधी माहिती कळवली.

त्यामुळे तात्काळ सर्व पोलीस पाटील अलर्ट झाले आणि लोकांनी रस्ते बंद करण्यास सुरुवात केली.पाली तालुका कराड या ठिकाणी सदर आरोपीस 7 तलवारी आणि पिकअप गाडीसह जेरबंद करण्यास उंब्रज पोलिसांना यश आले.

ताजी बातमी व जाहिरातीसाठी संपर्कः
मोबा.नं. 9920601001
info@surakshapolicetimes.com
diptibhogal@surakshapolicetimes.com

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

रिसेंट पोस्ट