ग्राम सुरक्षा यंत्रणेच्या तात्काळ व प्रभावी वापरामुळे घरातील वायरच्या शॉर्टसर्किटमुळे घराला लागलेली आग विझवण्यात यश…

0
Spread the love

उपसंपादक- रणजित मस्के

सातारा :-रविवार दिनांक 02/06/2023 रोजी मेढा पोलिस स्टेशन हद्दीतील रामगेघर ता. जावळी जिल्हा सातारा, रात्री दुपारी 11:45 वाजता श्री बाजीराव आप्पा करंदकर यांच्या घरातील पडवीमध्ये जनावरांचा चारा ठेवलेल्या ठिकाणी लाईटच्या वायरला शॉर्टसर्किट होऊन अचानक आग लागलेली आहे व घरात गॅस सिलेंडर पण आहे या भीतीने आसपासचा सर्व परिसर दणाणला,हे कळताच गावचे पोलीस पाटील श्री जयवंत एकनाथ करंदकर यांनी ग्रामसुरक्षा यंत्रणेच्या हेल्पलाइन (18002703600) नंबरवरून ही माहिती संपूर्ण गावाला कळवली आणि काही वेळातच तेथे गावातील गावकरी मदतीसाठी धावले.

प्रथम घरातील गॅस सिलेंडर बाहेर काढला आणि आग विझवण्यास सुरुवात केली.घरातील साहित्य वाचविण्यात ग्रामस्थांना यश आले;तसेच नागरिकांनी आग आजूबाजूला पसरू दिली नाही.त्यामुळे शेजारील घरापर्यंत आग पोहोचली नाही. ग्राम सुरक्षा यंत्रणेच्या तात्काळ व प्रभावी वापरामुळे शॉर्टसर्किटमुळे लागलेले आग विझवण्यात यश.

ताजी बातमी व जाहिरातीसाठी संपर्कः
मोबा.नं. 9920601001
info@surakshapolicetimes.com
diptibhogal@surakshapolicetimes.com

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

रिसेंट पोस्ट