फलटन येथे ग्रामसुरक्षा यंत्रणेच्या तात्काळ व प्रभावी वापरामुळे चोरीचा प्रयत्न फसला…!

0
Spread the love

उपसंपादक-रणजित मस्के

सातारा :– गुरुवार 08/02/2024 रोजी लोणंद पोलीस स्टेशन हद्दीतील मुळीकवाडी ता.फलटण, जिल्हा_ सातारा गावात रात्री 1:50 वाजता गावातील श्री सुधीर आवटे यांच्या घरी 2-3 चोर चोरीच्या उद्देशाने आलेले होते.

  हे लक्षात येताच गावचे पोलीस पाटील श्री शरद मुळीक यांनी घटनेचे गांभीर्य लक्षात घेता,तात्काळ ग्राम सुरक्षा यंत्रणेद्वारे (18002703600)सर्व गावाला   ही माहिती कळवली.

त्यामुळे तात्काळ गावकरी दाखल झाले.संपूर्ण गाव सतर्क झाल्याचे लक्षात येताच चोर अंधाराचा फायदा घेऊन पळून गेले व पुढील अनर्थ टळला.

ताजी बातमी व जाहिरातीसाठी संपर्कः
मोबा.नं. 9920601001
info@surakshapolicetimes.com
diptibhogal@surakshapolicetimes.com

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

रिसेंट पोस्ट