ग्रामसुरक्षा यंत्रणेच्या तात्काळ व प्रभावी वापरामुळे 7 एकर गायरान आणि जनावरांचा चारा आगीपासून वाचविण्यात ग्रामस्थांना यश..

उपसंपादक-रणजित मस्के
सातारा:– शनिवार दिनांक 09/03/2024 रोजी तळबीड पोलिस स्टेशन हद्दीतील वराडे ता. कराड जिल्हा सातारा,गावातील गायरानाला रात्री 8 वाजता आग लागलेली आहे, हे कळताच गावातील पोलीस पाटील श्री सुदाम किसन शिरसाट यांनी ग्रामसुरक्षा यंत्रणेच्या हेल्पलाइन (18002703600) नंबरवरून ही माहिती संपूर्ण गावाला कळवली आणि काही वेळातच तेथे गावातील गावकरी मदतीसाठी धावले व गायरानाला लागलेली आग ग्रामस्थांच्या मदतीने विझवण्यात यश आले, व उर्वरित 7 एकर गायरान आणि जनावरांचा चारा वाचविण्यात यश आले.
ताजी बातमी व जाहिरातीसाठी संपर्कः
मोबा.नं. 9920601001
info@surakshapolicetimes.com
diptibhogal@surakshapolicetimes.com