मुबंई गोवा हायवेवरील खरवलीफाटा येथे दुचाकीवरून घसरून झालेल्या अपघातात दुचाकीस्वार जागीच ठार…

प्रतिनिधी :-सचिन पवार
माणगांव :-मुबंई गोवा महामार्गवर आज सकाळी 10 वाजण्याच्या सुमारास ऍक्टिवा घसरून अपघात झाल्याची घटना घडली असून या अपघातात मयत महेंद्र शिवराम जाधव वय वर्ष ४७ रा. वारक ता. माणगांव याचा मृत्यू झाला आहे.

हा अपघात ऍक्टिवा क्र. एम एच ०६ बि वाय ०४६८ मौजे खरवली फाटा येथे घसरून झाला आहे.
सदर मिळालेल्या माहितीनुसार सविस्तर वृत्त असे की मयत महेंद्र शिवराम जाधव हा आपली ऍक्टिवा घेऊन माणगांव ते कोलाड दिशेने निघाला असता खरवली फाटा येथे गेले असता ऍक्टिवा घसरून खाली कोसळली यावेळी ऍक्टिवा वर बसलेला मयत इसम याचा तोल जाऊन तो खाली पडला यावेळी त्याच्या डोक्याला गंभीर स्वरूपात मार लागल्याने त्याच प्राणज्योत तितेच मावळली .
या घटनेची खबर माणगांव पोलीस ठाण्यात मिळताच माणगांव पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक श्री राजेंद्र पाटील हे घटनास्थळी पोहचले असून पुढील तपास माणगांव पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक श्री राजेंद्र पाटील यांच्या मार्गदर्शनखाली माणगांव पोलीस करीत आहेत.
या दुःखद घटनेची खबर वारक गावाला संमजतात वारक गावावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
ताजी बातमी व जाहिरातीसाठी संपर्कः
मोबा.नं. 9920601001
info@surakshapolicetimes.com
diptibhogal@surakshapolicetimes.com