दुचाकी चोर हेमंत यादव अखेर कोळसेवाडी पोलीसांच्या ताब्यात..

प्रतिनिधी विश्वनाथ शेनोय
दि २२ कल्याण ठाणे

कोळसेवाडी पोलीस ठाणेचे हद्दीत दिनांक १७ रोजी रात्री १०.०० वा. फिर्यादी अंकीत अजय सिंग, वय २९ वर्ष, राह सी १०२, गंगा अर्पाटमेंट, रामनगरी, चेतना स्कुल जवळ, हाजीमलंग रोड, कल्याण पुर्व यांनी मलंग ढाबा, जिया बार जवळ, मलंगरोड कल्याण पूर्व येथे पार्क केलेली होंडा युनिकॉर्न मोटार सायकल ही अज्ञात इसमाने चोरी करून नेली म्हणून कोळसेवाडी पोलीस ठाणे गुन्हा रजि. नं. ३१५/२०२५ भा.न्या. संहिता २०२३ चे कलम ३०३(२) प्रमाणे दि. २१/०४/२०२५ रोजी गुन्हा दाखल आहे. सदर दाखल गुन्हयाचे तपासात गुन्हे प्रकटीकरण पथकाचे अधिकारी व अंमलदार यांनी तांत्रीक माहीती व गुप्त बातमीदारांमार्फत माहीती काढून कौशल्यपुर्ण तपास करून अनोळखी आरोपी निष्पन्न करून आरोपी नामे हेमंत रामकुशल यादव, वय ३६ वर्ष, राह. ए २०४, आनंदी हेरीटेज, आर. के. टेलर जवळ, पिसवली, कल्याण पूर्व यास चोरी केलेल्या मोटार सायकल सह शिताफीने पकडून त्याचेकडून गुन्हयातील चोरी केलेली ६५,०००/- रू. किमतीची होडा युनिकॉर्न मोटार सायकल क्रमांक MH-05-EH-1680 हो जप्त केली आहे.
सदरची कारवाई पोलीस उप आयुक्त, परीमंडळ ३, कल्याण अतुल झेंडे, व सहा पोलीस आयुक्त कल्याण विभाग कल्याणजी घेटे यांचे मार्गदर्शनाखाली कोळसेवाडी पोलीस ठाणेचे वपोनिरी. गणेश न्हायदे, सहा. पो. निरो दर्शन पाटील, सहा. पो. निरी संदीप भालेराव, पोहवा/५०३ विशाल वाघ, गोहवा/२१५ दत्तु जाधव, पोहवा/१४७१ विकास भामरे, गोहवा/३११२ सौंदाणे, पोहवा/१२२६ शांताराम सांगळे, पोशि/ २६५६ दिलीप सोनावळे यांचे पथकाने केलेली आहे.