ड्रग्जमुक्त मुंबई’ साठी पोलिसांची मुलुंडमध्ये नागरिकांसाठी मॅरेथॉन जनजागृती..

0
Spread the love

सह संपादक- रणजित मस्के

घाटकोपर ; मुलुंडमध्ये पोलिसांच्या परिमंडळ सातच्या वतीने रविवारी (ता. ९) ‘मुलुंड मॅरेथॉन’चे आयोजन करण्यात आले होते. त्यामध्ये तब्बल २५० पोलिस अधिकारी आणि अंमलदार यांनी सहभाग नोंदवला.मुंबईचे पोलिस आयुक्त विवेक फणसाळकर यांच्या संकल्पनेतील ‘ड्रग्जमुक्त मुंबई’ आणि ‘सायबर सुरक्षा याबाबतचा संदेश’ या दौडमधून पोलिसांनी दिला. मुलुंडचे आमदार मिहिर कोटेचा यांनी ‘फिट इंडिया’अंतर्गत या मॅरेथॉनचे आयोजन केले होते.ड्रग्ज फ्री मुंबई आणि सायबर सिक्युअर मुंबई हा उपक्रम पोलिस आयुक्तांनी संपूर्ण मुंबईत राबवण्याचे आवाहन पोलिस प्रशासनाला केले. यापार्श्वभूमीवर या दौडमधून नागरिकांना संदेश दिल्याचे पोलिस उपायुक्त विजयकांत सागर यांनी दिली. ही मॅरेथॉन मुलुंड भागात जवळपास चार किमी अंतर पार पडली.यावेळी पोलिस तंदुरुस्त असावा, यासाठी हा फिटनेस मंत्रही या वेळी देण्यात आला. दरम्यान, उपायुक्त विजयकांत सागर यांनी परिमंडळ पदभार स्वीकारल्यानंतर अमली पदार्थविरोधी आणि सायबर सुरक्षा तसेच बांगलादेशी नागरिकांवर कारवाई करण्याची मोहीम हाती घेतली आहे. त्याचे प्रतिबिंब या दौडमधून दिसून आले. ‘ड्रग्जमुक्त मुंबई’ आणि ‘सायबर सुरक्षा याबाबतचा संदेश’ नागरिकांसह विद्यार्थ्यांना दिला असल्यामुळे याचा नक्कीच फायदा होणार असल्याचे मत व्यक्त करण्यात आले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

रिसेंट पोस्ट