मोबाईलचा वापर शिक्षणासाठी करा डॉ. विशाल माने यांचे आवाहन

उपसंपादक – रणजित मस्के
नवीमुंबई :- मोबाईलचा वापर हा मनोरंजनासाठी नव्हे, तर शिक्षणासाठी करावा, असे आवाहन सहायक पोलीस निरीक्षक डॉ. विशाल माने यांनी केले. पुणे विद्यार्थी गृहाच्या नेरूळ येथील विद्याभवन शिक्षण संकुलात नवी मुंबई पोलिसांच्या सहकार्याने स्माइल्स फाऊंडेशनद्वारे जागरूक नवी मुंबईकर अभियान आयोजित करण्यात आले. या कार्यक्रमात सर्व विद्यार्थी आणि पालकवर्गास माने यांनी संबोधित केले.
ऑनलाइन फ्रॉड, सायबर गुन्हे व सुरक्षा, मुली व महिलांसंबंधित गुन्हे व सुरक्षा, सोशल मिडिया संबंधित सायबर गुन्हे व काळजी, जॉब फ्रॉड, अमली पदार्थ सेवन तर अनावधनाने होणारे गुन्हे टळतील व व्यसनमुक्ती, जेष्ठ नागरिकांची सुरक्षा व काळजी, बेवारस आणि संशयास्पद वस्तु तसेच व्यक्तीची माहिती, रास्ते सुरक्षा व अपघात प्रतिबंध, ड्रायविंग लायसन संबंधित नियम, ‘गुड टच, बँड टच’ वर डॉ. माने यांनी सविस्तर माहिती दिली. नवी मुंबईमध्ये १०० ऐवजी ११२ हा नंबर आपतकालीन मदत नंबर गेली वर्षभर बदललेला आहे, असे दत्तात्रय पवार यांनी सांगितले.

फक्त शिक्षणासाठी मोबाइलचा वापर करणे गैर नाही. सोशल मीडियाचा मर्यादित वापर करणे चुकीचे नाही, परंतु त्याच्या सुरक्षेसंदर्भात पूर्ण प्रशिक्षण घ्या. याद्वारे अनावधानाने होणारे गुन्हे टाळता येतात. प्रत्येकाने यशस्वी होण्याचे स्वप्न पहा आणि ते पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करा. ग्रंथालयांना वारंवार भेट द्या. समाजात आदर्श घालून दिलेल्या व्यक्तीचे चरित्र वाचा. आसपास अनेक संस्था कौशल्य विकास कोर्स घेतात, त्यांचा उपयोग करून घ्या. प्रत्येकाला करियर मध्ये यशस्वी व्हायचेच आहे. पण त्या अगोदर जबाबदार आणि जागरूक नागरिक होण्याचे आवाहन डॉ. माने यांनी विद्यार्थ्यांना केले.
ताजी बातमी व जाहिरातीसाठी संपर्कः
मोबा.नं. 9920601001
info@surakshapolicetimes.com
diptibhogal@surakshapolicetimes.com