“एक हात मदतीचा ” निमित्त पालघर येथे डाॅ.बाबासाहेब आंबेडकर प्रीमियर लीग २०२४ चे आयोजन संपन्न…

0
Spread the love

प्रतिनिधी- मंगेश उईके

पालघर:– डॉ. बाबासाहेब आंबेडकर कमिटी पालघर जिल्हा च्या वतीने क्रिकेट सामन्या सोबत विविध स्पर्धा सुद्धा आयोजित केलेल्या होत्या.

महत्त्वाचा मुद्दा म्हणजे समाजातील तळागाळातील होतकरू अश्यांना एक चांगला प्लॅटफॉर्म मिळवा या कार्यक्रमाच्या माध्यमातून मदत होईल अशा सामाजिक हेतुने आयोजित डॉ. बाबासाहेब आंबेडकर प्रीमियर लीग – २०२४ चे आयोजक प्रशांत गायकवाड,आनंद राऊत ,प्रशांत तांबे ,अनिश गायकवाड, सुमित गायकवाड, संदेश पवार, हिमाचल जाधव यांच्या नियोजनाने उत्कृष्ट समालोचन करत गुरुनाथ तांबे व कृतिक राऊत यांनी सुंदर समालोचनची धुरा सांभाळत कार्यक्रम आयोजित केला होता.

महत्त्वाचा उद्दिष्ट म्हणजे. एक हात मदतीचा* डॉ. बाबासाहेब आंबेडकर प्रीमियर लीग कमिटी पालघर जिल्हा. आयोजित क्रिकेट स्पर्धा / संगीत स्पर्धा / वक्तृत्व स्पर्धा या स्पर्धेच्या माध्यमातून होणारा आर्थिक मोबदला हा गरजू लोकांना शैक्षणिक व वैद्यकीय मदतीसाठी वापरण्याच्या दृष्टिकोन समोर ठेवून आयोजकाने ही स्पर्धा आयोजित केली आहे एक सामाजिक बांधिलकी जपण्याच्या प्रयत्न हे मंडळ आज पर्यंत करीत आले आहे.

तसेच आयोजकाने आज पर्यंत बऱ्याच गरजू रुग्णांना वैद्यकीय अडचणी मध्ये मदतीचा हात दिला आहे आणि पुढेही मदतीचे हे काम असेच चालू राहील असे आयोजकाचे म्हणणे आहे. तसेच या स्पर्धेमध्ये विजयी झालेले पुढील प्रमाणे संगीत स्पर्धा – प्रथम पारितोषिक – मनोज गांगुर्डे मोखाडा रोख रक्कम 15000 व आकर्षक चषक द्वितीय पारितोषिक – ज्ञानदीप कासले . पालघर 11000 व आकर्षक चषक. उत्तेजनार्थ तृतीय पारितोषिक – मनवा राऊत अंबोडे वक्तृत्व स्पर्धा प्रथम पारितोषिक – श्रेया गायकवाड चटाळे द्वितीय पारितोषिक अभिज्ञ पुष्पाकर गायकवाड आंबेडकर नगर पालघर क्रिकेट स्पर्धा प्रथम पारितोषिक – 55000 विजेता संघ – सावन जाधव आणि अल्केश गायकवाड पाम आंबेडकर नगर द्वितीय पारितोषिक – 33000 विजेता संघ – तथास्तु फायटर संघमालक अमित जाधव वसई तृतीय पारितोषिक – 22000 विजेता संघ अशोका फायटर संघ मालक – अनिश गायकवाड आणि हिमाचल जाधव पालघर जिल्हा आयोजित डॉ. बाबासाहेब आंबेडकर कमिटी पालघर जिल्हा च्या वतीने उत्कृष्ट रित्या कार्यक्रमचे आयोजित केला होता.

त्यामुळे विजेता क्रिकेटसंघ व विविध स्पर्धेतील विजितांचे हार्दिक हार्दिक अभिनंदन करत बाबासाहेब आंबेडकर कमिटीने शुभेच्छा दिल्या या कार्यक्रमाला उपस्थित प्रमुख पाहुणे उपनगराध्यक्ष उत्तम दादा घरत तसेच नगरसेवक प्रवीण मोरे माजी नगरसेवक संजय गायकवाड माजी नगरसेवक बंड्या मात्रे आरपीआय जिल्ह्याचे अध्यक्ष सुरेशदादा जाधव युवा अध्यक्ष शरद जाधव दलित पॅंथर चे काँग्रेसचे प्रवक्ता अविष राऊत तसेच अनिल गायकवाड व ऍड. निखिल राऊत तसेच महाराष्ट्र पोलीस बॉईज संघटना संजय राऊत संदेश मोरे व मंगेश उईके तसेच पत्रकार ऋषिकेश जाधव व इतरही मान्यवर कार्यक्रमाला उपस्थित होते हा कार्यक्रम अतुलनिय आनंदात व जल्लोषात साजरी झाला.

ताजी बातमी व जाहिरातीसाठी संपर्कः

मोबा.नं. 9920601001

info@surakshapolicetimes.com

diptibhogal@surakshapolicetimes.com

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

रिसेंट पोस्ट