आंतरराष्ट्रीय मानवी तस्करी करणाऱ्या टोळी प्रमुखासह दोघांना मुंबई गुन्हे शाखा ८ ने घातल्या बेडया…

उपसंपादक-रणजित मस्के
मुंबई :-परदेशात नोकरीचे स्वप्न दाखवून भारताची मुंबईमधून आंतरराष्ट्रीय मानवी तस्करी करणाऱ्या टोळीचा गुन्हे शाखा, कक्ष ८ ने पर्दाफाश केला. बेरोजगार तरूणांना परदेशातील गलेलठ्ठ पगाराच्या नोकरीचे आमिष दाखवून त्यांच्याकडून बेकायदेशीर कामे करवून घेणाऱ्या टोळीप्रमुखासह दोघांना जेरबंद करण्यात आले आहे.
२३ मार्च २०२४ रोजी विलेपार्ले पोलीस ठाण्यात ( गु.र. क्र २९८/२४ कलम ४२०, ३७०, ३२३, ३४२, ३४६, ३४७, ३८६, ५०४, ५०६, ३४, १२० (ब) भा.द.वि. सं सह कलम १०, २४ इमीग्रेशन अॅक्ट १९८३) गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेत या गुन्ह्याचा तपास गुन्हे शाखा कक्ष ८ चे पथक करू लागले. तपासादरम्यान आंतरराष्ट्रीय मानवी तस्करी टोळीचा प्रमुख व त्याचा मुख्य साथीदार मुंबईत असल्याची माहिती प्राप्त झाली.
त्यानुसार कक्ष ८, चे पोलीस पथकाने परदेशात पलायन करण्याच्या आधीच जेरी फिलीप्स जेकब (वय ४६), गॉडफ्री थॉमस अल्वारेस (वय ३९) यांना अटक केली.
या आरोपींनी भारतातील विविध शहरातील गरजूंना परेदशात नोकरीचे आमिष दाखवून प्रत्यक्षात त्यांना लाओस या देशामध्ये विनापरवाना प्रवेश करावयास लावून त्यांच्याकडून फसवणूकीची बेकायदेशीर कृत्ये करवून घेतले. हे काम करण्यास विरोध करणाऱ्या तरूणांना बेकायदेशीर अटकाव करून भारतात परत जाण्याकरीता खंडणी घेतल्याचे निष्पन्न झाले आहे. काही प्रकरणात बळीत तरूणांनी स्वतःची सुटका करून भारतात परतल्याचे निदर्शनास आले आहे. ही उल्लेखनिय कारवाई पोलीस आयुक्त विवेक फणसळकर, विशेष पोलीस आयुक्त देवेन भारती, पोलीस सह आयुक्त (गुन्हे) लखमी गौतम, अपर पोलीस आयुक्त (गुन्हे) शशिकुमार मीना, पोलीस उप आयुक्त (प्रकटीकरण-१) विशाल ठाकुर, सहाय्यक पोलीस आयुक्त डी (प.) महेश देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली कक्ष ८ चे प्रपोनि लक्ष्मीकांत साळुंखे, सपोनि मनोजकुमार प्रजापती, सपोनि मधुकर धुतराज, सपोनि राहुल प्रभु, सपोनि संग्राम पाटील, पोउनि विकास मोरे, पोउनि जयेंद्र कानडे, सपोउनि शिरसाट, सपोउनि बनसोडे, पोह यादव, पोह किणी, पोह काकडे, पोह सावंत, पोशि रहेरे, पोशिक्र सटाले, मपोशि गायकवाड यांनी केली.
ताजी बातमी व जाहिरातीसाठी संपर्कः
मोबा.नं. 9920601001
info@surakshapolicetimes.com
diptibhogal@surakshapolicetimes.com