डोंबिवलीत कंपनी व्यवस्थापकावर हल्ला करणारया 4 आरोपीस ठोकल्या बेड्या…

उपसंपादक -रणजित मस्के
डोंबिवली:- कंपनीतील आपला फर्निचरचा ठेका बंद करुन तो दुसऱ्याला दिला, या रागा तून ठेकेदाराने दिलेल्या सुपारीवरुन दोन जणांनी येथील एमआयडीसीतील एका कंपनीच्या व्यवस्थापकावर हल्ला केला होता. या प्रकरणात कल्याण गुन्हे शाखेच्या पथकाने ठेकेदारासह दोन हल्लेखोरांना डोंबिवली जवळील गावांमधून शनिवारी अटक केली.
पंकज प्रल्हाद पाटील (३१, ठेकेदार रा. सोनारपाडा), शैलेश रावसाहेब राठोड (३०, रा. देशमुख होम्स, टाटा नाका, डोंबिवली), सुशांत लक्ष्मण जगताप (२७, रा. दिलीप सदन, दत्तमंदिरा जवळ, कोळसेवाडी, कल्याण), महेश शामराव कांबळे (३१, ठाकूर काॅम्पलेक्स, सोनारपाडा) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.
तक्रारदार सुरेंद्र मौर्या (४१) डोंबिवली एमआयडीसीतील बीईडब्ल्यू कंपनीत व्यवस्थापक म्हणून काम करतात. गेल्या महिन्यात संध्याकाळच्या वेळेत कार्यालयीन वेळ संपल्यावर ते दुचाकीने घरी जात होते. एमआयडीसीतील म्हात्रेनगर येथे आल्यावर मौर्या यांच्या पाठीमागून दुचाकीवरुन दोन जण आले. त्यांनी मौर्या यांची दुचाकी थांबवली. त्यांना लोखंडी गजाने मारहाण करुन गंभीररित्या जखमी करुन मारेकरी पळून गेले होते. मानपाडा पोलीस ठाण्यात मौर्या यांनी तक्रार केली होती.
कल्याण गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक किशोर शिरसाठ यांच्या मार्गदर्शनाखाली याप्रकरणाचा गुन्हे शाखेने तपास सुरू केला होता. गुन्हे शाखेतील हवालदार गुरुनाथ जरग, विश्वास माने यांनी मौर्या यांच्यावर हल्ला झालेल्या ठिकाणचे सीसीटीव्ही चित्रण तपासले. त्यांना दोन इसम या भागात घुटमळत असल्याचे दिसले. त्याचा माग सीसीटीव्ही चित्रण, तांत्रिक माहितीच्या आधारे गुन्हे शाखेच्या पथकाने काढला. आरोपी डोंबिवली जवळील २७ गाव भागात असल्याची गुप्त माहिती जरग, माने यांना मिळाली.

वरिष्ठ निरीक्षक शिरसाठ यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक मोहन कळमकर, साहाय्यक उपनिरीक्षक संजय माळी, हवालदार गुरुनाथ जरग, बालाजी शिंदे, विश्वास माने, प्रशांत वानखेडे, अनुप कामत, बापूराव जाधव, प्रकाश इदे, किशोर पाटील, सचिन वानखेडे, मिथून राठोड, एम. एस. बोरकर यांनी २७ गावातील सोनारपाडा, टाटा नाका भागात पाळत ठेवली. या भागातून मुख्य आरोपींना अटक केली.
ताजी बातमी व जाहिरातीसाठी संपर्कः
मोबा.नं. 9920601001
info@surakshapolicetimes.com
diptibhogal@surakshapolicetimes.com