डोंबिवली पोलीसानी घरफोडी करणा-या आरोपीस १२ तासाच्या आत अटक करुन ६२,०००/- रुपये किंमतीचा मुददेमाल केला हस्तगत…

0
Spread the love

उपसंपादक – रणजित मस्के

डोंबिवली : दि. ०१/०२/२०२३ रोजी रात्री ०९.०० वा ते दि ०२/०२/२३ रोजी सकाळी ०६:३० वा. चे दरम्यान फिर्यादी नामे श्रध्दा सुधीर म्हाप्रळकर, वय ५० वर्षे, धंदा – घरकाम, रा. अच्युत निवास रूम न.७१ ला माळा, दत्तनगर डोंबिवली पूर्व यांचे राहते घराचे पाठीमागील स्लायडींग खिडकीची बाहेरील लोखंडी ग्रिल उचकटून त्यावाटे घरात प्रवेश करून घरातील बंद लोखंडी कपाटाचा दरवाजा व कपाटाचे बंद लॉकर कशाचेतरी साहयाने उचकटून कपाटाच्या लॉकरमधील ६०,०००/- रू. किंमतीचे सोन्याचे दागिने व १०,०००/- रू. रोख रक्कम असा एकुण ७०,०००/- रू. किंमतीचा मुद्देमाल कोणीतरी अज्ञात चोरटयाने फिर्यादीचे संमतीशिवाय लबाडीने घरफोडी चोरी करून चोरून नेला म्हणुन फिर्यादी यांनी दिलेल्या तकारीवरून डोंबीवली पोलीस ठाणेस गुरनं. ५१ / २०२३ भा.दं.वि. ४५७, ३८० प्रमाणे दि. ०२/०२/२०२३ रोजी २०:०६ वाजता गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दिनांक ०२/०२/२०२३ रोजी २०.०६ वा दाखल झाल्यानंतर, सदर गुन्हयातील आरोपीताचा शोध घेण्याकरीता परीसरातील आजुबाजुचे सिसीटीव्ही तपासुन त्यातुन संशयीताचे फुटेज प्राप्त झाल्याने त्या आधारे गुप्त बातमीदारांच्या मार्फतीने सदर आरोपीचा शोध घेवून गुन्हे प्रकटीकरण अधिकारी व स्टाफ यांनी त्यास सापळा रचुन ताब्यात घेवुन त्यास दिनांक ०३/०२/२३ रोजी ००.१३वा अटक करुन त्याचेकडुन नमुद गुन्हयातील ६०,००० रुपये किंमतीचे दागिने व २००० रुपये रक्कम हस्तगत करण्यात आली. सदरचा आरोपीताचा शोध १२ तासाचे आत घेवुन त्यास अटक केली आहे.

अटक आरोपीचे नाव व अटक केल्याची तारीख व वेळ १) किशन अशोक कारले वय २८ वर्षे रा. केशव निवास बिल्डिंगच्या मागे सांगितावाडी झोपडपटटी डोंबिवली पूर्व

सदरची कामगिरी ही मा. पोलीस उपआयुक्त सो, श्री सचिन गुंजाळ, मा.सहा. पोलीस आयुक्त सों, श्री सुनिल कुराडे, मा. वपोनि श्री. सचिन सांडभोर, मा. पोनि (गुन्हे) श्री. समशेर तडवी, पोनि प्रशासन यांचे मार्गदर्शनाखाली डोंबिवली पोलीस ठाणे गुन्हे प्रकटीकरण पथकाचे सपोनि / योगेश सानप, सपोनि / बळवंत भराडे, पोहवा/विशाल वाघ, पोहवा / प्रशांत सरनाईक पोहवा / सुनिल भणगे, पोहवा / सचिन भालेराव, पोहवा / तुळशीराम लोखंडे, पोना / हनुमंत कोळेकर, पोअं/शिवाजी राठोड, पो. अं निलेश पाटील यांनी केली आहे.

ताजी बातमी व जाहिरातीसाठी संपर्कः

मोबा.नं. 9920601001

info@surakshapolicetimes.com

diptibhogal@surakshapolicetimes.com

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

रिसेंट पोस्ट