डोंबिवली पोलीसांनी मोटार वाहन चोरी करणा-या आरोपीतास अटक करुन त्याचेकडुन एकुण २,७९,०००/- किमंतीच्या ४ मोटार सायकल हस्तगत करुन ठाणे पोलीस आयुक्तालयातील ४ गुन्हे उघडकीस आणले…

0
Spread the love

प्रतिनिधी-रणजित मस्के

डोंबिवली : दिनांक 12 डिसेंबर 2022 रोजी मिळालेल्या माहितीनुसार फिर्यादी नाम करण किशोर सागवेकर वयः-१८ वर्षे, व्यवसाय- नोकरी राह. रूम नं ०५, शिव अमृत चाळ ओ विंग सरोवर नगर डोंबिवली पश्चिम यांची इंस्टाग्राम वरुन ओळख झालेला व्यक्ती नामे अनिकेत वाडकर याने त्यास भेटायचे आहे. असे सांगुन त्यास दिः–०१/११/२०२२ रोजी संध्याकाळी ६:३० वाजता ठाकुर्ली रेल्वेस्टेशन जवळ डोंबिवली पुर्व येथे सार्वजनिक रोडवर भेटुन फिर्यादी कडे असलेली नवीन इर्टक्यु टीव्हीसी कंपनीची मोटार स्कुटी ही कशी चालते हे पाहण्यासाठी राईड मारण्यासाठी घेवुन गेला तो परत आला नाही म्हणुन डोंबिवली पोलीस ठाणेत फिर्यादीने दिलेल्या तक्रारीवरुन डोंबिवली पोलीस ठाणे गुर कः-४०६/२०२२ कलम : – ४०६ भादंवि प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला.

सदर गुन्हयाचा तपास हा सपोनि योगेश सानप करीत होते.
डोंबिवली पोलीस ठाणे गुन्हे प्रकटीकरण पथकाचे सपोनि योगेश सानप, सपोनि भराडे, पोहवा ५०३/विशाल वाघ, पोहवा ३७३७/ शंकर निवळे, पोहवा १३०७/प्रशांत सरनाईक, पो. अं/३४०६, शिवाजी राठोड, पो. अं.८४१३/नितीन सांगळे यांनी नमुद गुन्हयातील आरोपीताचा सीसीटीव्ही तसेच तांत्रिक मदतीच्या आधारे दिनांक: – ०९/१२/२०२२ रोजी सायंकाळी नमुद गुन्हयातील आरोपीत हा कल्याण पश्चिम परीसरात फिरत असल्याची माहीती मिळाल्यावरुन सपोनि सानप व पथकाने त्यास सापळा रचुन योग्य स्टाफ च्या मदतीने ताब्यात घेवुन त्यास अटक करुन त्यांचेकडे अधिक चौकशी केली असता त्याने कोपरी – ठाणे कोळशेत—ठाणे, मानपाडा–डोंबिवली व ठाकुर्ली-डोंबिवली परीसरात खालील नमुद प्रमाणे मोटार सायकल चोरी केल्याची कबुली देवुन त्याचेकडुन हस्तगत केल्या.

१) एक निळया काळया रंगाची टीव्हीएस कंपनीची एन्टॉर्क मोटार स्कुटी, एम. एच:- ०५, एफ. सी:-४७५९ (डोंबिवली पोलीस ठाणे गु र क ४०६/२२ कलमः– ४०६भादंवि)
२) एक सफेद रंगाची होन्डा अॅक्टीव्हा स्कुटी ६ – जी, (कोपरी पोलीस ठाणे गु.र. कः – १८५ / २२
३) एक निळया रंगाची सुझुकी अॅक्सेस स्कुटी – १२५, (मानपाडा पोलीस ठाणे गु र क:- ८२२ / २२
एम.एच: -०४, एल ए: – ४११३ कलम : – ३७९ भादंवि)
एम. एचः – ०५, ई.बी:- ३०२४ कलम :- ३७९ भादंवि )
४) एक R15 मोटार सायकल क:- एम एच : – ०४ के.ई: – १२१५ (कापुरबावडी पोलीस ठाणे गु.र.कः-३८७ / २२ कलम: – ४०६ भादंवि)

सदरची कामगिरी मा. पोलीस उप आयुक्त, परिमंडळ – ३, कल्याण श्री. सचिन गुंजाळ साो, मा. सहाय्यक पोलीस आयुक्त, डोंबिवली विभाग श्री. सुनिल कुराडे साो, वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. सचिन सांडभोर सो, पोनि सरडे साो, पोनि / तडवी साो, यांचे मार्गदर्शनाखाली डोंबिवली पोलीस ठाणे गुन्हे प्रकटीकरण पथकाचे सपोनि योगेश सानप, सपोनि बळवंत भराडे, पोहवा : – ५०३ / विशाल वाघ, पोहवा : ३७३७/ शकंर निवळे, पोहवा- १३०७/प्रशांत सरनाईक, पोहवा १९२४/भणगे, पोना ७०९२ / कोळेकर, पो.ना. ४५७/दिलीप कोती, पोअं:- ८४१३ / नितीन सांगळे, ३४०६ / शिवाजी राठोड, पोअं ३९९८/ निलेश पाटील, यांनी कामगिरी केली आहे.

ताजी बातमी व जाहिरातीसाठी संपर्कः

मोबा.नं. 9920601001

info@surakshapolicetimes.com

diptibhogal@surakshapolicetimes.com

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

रिसेंट पोस्ट