डोळयात लाल मिर्ची पाउडर टाकुन जबरीने पैसे लुबाडणाऱ्या दोघांना चिंचवड पोलीसांनी ठोकल्या बेड्या..

0
Spread the love

उपसंपादक-रणजित मस्के

गोंदिया : – 1 लाख 38 हजार 580/- रुपये हस्तगत करुन गुन्ह्यात जप्त….. 24 तासाचे आत गुन्ह्याचा उलगडा..

याबाबत थोडक्यात हकीगत अशी की फिर्यादी श्री. सुमनलाल कोरटीया रा. कुवारदल्ली ता.जि. मोहल्ला, मानपुर चौक (छ.ग.) हे भारत फाईनेंशियल इन्क्लुजन लिमि. इन्डसइन्ड बँक शाखा- छुरीया जि. राजनांदगाव (छ.ग.) येथील बॅकेतुन कर्ज घेतलेले कर्जदार मौजा सुंदरी, गरारटोला, पालांदुर, मगरडोह, रामगड, यांचेकडुन कर्जाचे आठवडी किस्तीचे पैश जमा करुन मौजा- सुकळी मार्गे सिंगनडोह फाट्यावरुन चिचगड मार्गे छुरीया येथे परत जात असतांनी सिंगनडोह फाटयाजवळ जंगल भागात फिर्यादीचे मागेहुन दोन अनोळखी मोटार स्वार ईसमांनी फिर्यादीला थांबा थांबा असे बोलुन मोटार सायकल आडवी करुन त्यापैकी मागे बसलेल्या अनोळखी ईसमाने लाल मिर्ची पाउडर फिर्यादी यांचे डोळयात टाकुन फिर्यादी शी झटापट्टी, मारपीट करुन फिर्यादी जवळील किस्तीचे रकमेची बॅग जबरदस्तीने हिसकावुन बॅगमध्ये असलेले किस्ती ची रक्कम एकुण.. 1,95,434/-रुपये नगदी कॅश बॅगसह घेवुन मो. सा. नी पळुन गेले. अशा फिर्यादी यांचे तक्रारी वरुन पो. ठाणे चिचगड येथे अपराध क्र. 77/2024 कलम 309 (6), 3 (5) भा.न्या.सं. 2023 अन्वये दाखल करण्यात आले होते.

सदर गुन्हाचे गांभीर्य लक्षात घेता मा. वरिष्ठांचे निर्देश सूचना आदेशान्वये उपविभागीय पोलीस अधिकारी, उपविभाग देवरी यांचे मार्गदर्शनात पो. ठाणे चीचगड येथील पोलीस पथकाने तत्परतेने गुप्त बातमीदार यांचेकडून आरोपीतांचे वर्णनावरून मिळालेली माहिती व तांत्रिक माहितीच्या आधारे- ईसंम आरोपी नामे – 1) तीलोचन ईश्वरलाल पटेल वय 38 वर्षे…..2) एवनदास ईश्वरदास माणिकपुरी वय 37 वर्षे दोन्ही राहणार – कल्लो बंजारी ता. छुरिया जिल्हा राजनांदगाव (छ. ग.)

यांना गुन्ह्याचे अनुषंगाने ताब्यात घेण्यात येवून दोघांनाही गुन्ह्या बाबत सखोल विचारपुस तपास केला असता दोन्ही आरोपीतांनी गुन्हा केल्याचे कबुल केले… दोन्ही आरोपीतांना गुन्ह्यात अटक करण्यात येवून आरोपीतांना मा. न्यायालयात हजर करून दिनांक- 09/09/2024 रोजी पर्यंत पोलीस कोठडी रिमांड घेण्यात आला असून गुन्ह्याचे तपासा दरम्यान दोन्ही आरोपीतांचे ताब्यातून गुन्ह्यांत जबरिने लुबाडलेली रक्कम रूपये 1 लाख 38 हजार 580/- गुन्ह्यात हस्तगत करून जप्त करण्यात आलेली आहे..

सदरची कारवाई पोलीस अधीक्षक श्री. गोरख भामरे, अप्पर पोलीस अधीक्षक श्री. नित्यानंद झा, यांचे निर्देश सूचनाप्रमाणे उपविभागीय पोलीस अधिकारी देवरी श्री. विवेक पाटील, पो ठाणे चिचगड प्रभारी.. सपोनि तुषार काळेल, यांचे मार्गदर्शनात पोलीस पथक- पोउपनि कैलाश खासबागे, पो. अंमलदार रामलाल पदमे, दशरथ मसराम, सुनील नामुर्ते, कमलेश शहारे, हिरासिंग कनपुरीया, कृष्णा कानस्कर, संदीप तांदळे यांनी कामगिरी केली आहे……सदर कारवाई दरम्यान सायबर सेल चे संजू मारवाडे, रोशन येरणे, योगेश रहीले व स्था.गु. शा. चे पोउपनि सैदाने, पो.अंमलदार लुटे, केदार, भांडारकर, चालक कुंभलवार अश्या पोलीस पथकाचे मोलाचे सहकार्य लाभले..

ताजी बातमी व जाहिरातीसाठी संपर्कः
मोबा.नं. 9920601001
info@surakshapolicetimes.com
diptibhogal@surakshapolicetimes.com

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

रिसेंट पोस्ट