मारहाण करुन जबरीने पैसे लुटणाऱ्या दोघा अट्टल सराईत गुन्हेगारांना गोंदिया शहर डी.बी. पथकाने केले जेरबंद…

0
Spread the love

उपसंपादक-रणजित मस्के

गोंदिया :- फिर्यादी श्री. गोपाल त्रिलोकचंद शर्मा, वय 26 वर्षे, रा. चव्हाण चौक, श्रीनगर गोंदिया हे दि.02/10/2024 रोजी सायंकाळी 05.00 वा. सुमारास सावित्री बाई फुले मार्गे ढाकणी जाणाऱ्या रोडवर फिरत असतानी आरोपी 1) गोलु चौधरी व 2) मित्तल तुपटे यांनी फिर्यादीस चाकुचा धाक दाखवुन दगडाने फिर्यादीच्या छातीवर, नाकावर मारुन जखमी केले व अश्वील शिवीगाळ करुन मारण्यापिटण्याची धमकी देवून फिर्यादीच्या पँटच्या खिशातुन 1410/- रु. जबरीने हिसकावून पळुन गेल्याचे फिर्यादीचे तक्रार व वैद्यकीय परिक्षण अहवालावरुन गोंदिया शहर पोलीस ठाणे येथे रात्री गुन्हा दाखल करण्यात आलेला होता. घटनेनंतर दोन्ही आरोपी हे फरार झाले होते.



गोंदिया शहर पोलीस ठाणे येथील पोलीस निरीक्षक श्री किशोर पर्वते यांचे मार्गदर्शनात डी.बी. पथकातील पोलीस अंमलदार यांनी गोपनिय सुत्राच्या आधारे फरार झालेल्या आरोपीतांचा शोध घेवुन आरोपी नामे-

1) घनशाम ऊर्फ गोलु अशोक चौधरी, वय २० वर्षे, रा. मालवीय वार्ड, श्रीनगर गोंदिया आणि

2) मित्तल मुनेश्वर तुपटे, वय १८ वर्षे २ महिने, रा. पैकनटोली, गौशाला वार्ड गोंदिया

यांना ताब्यात घेवून त्याच्याकडे गुन्ह्याचे अनुषंगाने सखोल चौकशी विचारपूस, तपास केला असता त्यांनी सदर गुन्हा केल्याचे कबुल केल्याने त्यांना गुन्ह्यात दि. 03/10/2024 रोजी अटक करुन त्यांच्याकडुन गुन्हयात वापरलेला दगड व चाकु जप्त केलेला आहे… तसेच त्यांनी गुन्हयात फिर्यादीस जखमी करुन जबरीने हिसकावलेली रक्कम नशामध्ये खर्च केल्याचे सांगितले. अटक आरोपी हे सराईत गुन्हेगार असुन त्यांच्याविरुध्द पो.स्टे. गोंदिया शहर, रामगनर, रावणवाडी मध्ये खुनाचा प्रयत्न, घरफोडी, जबर दुखापत, शिवीगाळ करुन धमकी देवून दुखापत करणे, जबरी चोरी, चोरी, दरोडा, शांतता भंग घडवुन आणण्याच्या उद्देशाने अपमान करणे, धमकी देणे, अजाज अप्रका अधि., अवैध शस्त्र बाळगणे, दुखापत, खुन करण्यासाठी अपहरण करणे, इ. गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत. दोन्ही आरोपी हे दि.05/10/2024 रोजीपर्यंत पीसीआर मध्ये आहेत.

सदरची कामगीरी मा. श्री. गोरख भामरे, पोलीस अधिक्षक, गोंदिया, श्री. नित्यानंद झा, अपर पोलीस अधिक्षक गोंदिया, श्री साहील झारकर, उपविभागीय पोलीस अधिकारी गोंदिया यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस स्टेशन गोंदिया शहरचे पोलीस निरिक्षक श्री किशोर पर्वते, डी. बी. पथकाचे पो.हवा. जागेश्वर उईके, कवलपालसिंग भाटीया, सुदेश टेंभरे, सतिश शेंडे, निशिकांत लोंदासे, दिपक रहांगडाले, प्रमोद चव्हाण, मपोहवा रीना चव्हाण, पोशि. सुभाष सोनवाने, मुकेश रावते, दिनेश बिसेन, कुणाल बारेवार व अशोक राहांगडाले यांनी केली आहे.

ताजी बातमी व जाहिरातीसाठी संपर्कः
मोबा.नं. 9920601001
info@surakshapolicetimes.com
diptibhogal@surakshapolicetimes.com

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

रिसेंट पोस्ट