दिवसा वाहन चोरी करणारा अट्टल चोर हिंजवडी पोलीसांच्या जाळयात १८ मोटार सायकल केल्या जप्त…

उपसंपादक – रणजित मस्के
पुणे :


पिंपरी चिंचवड परिसरातील मोटार सायकल चोरीचे वाढते प्रमाण लक्षात घेता मा. श्री विनयकुमार चौबे सो
पोलीस आयुक्त, पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालय, यांनी मोटार सायकल चोरीच्या गुन्हयांना आळा घालण्यासाठी प्रभावी उपाय योजना राबवुन मोटार सायकल चोरीच्या गुन्हयांना आळा घालणे बाबत आदेशीत केले होते. हिंजवडी पोलीस ठाणे हद्दीतुन काही विशीष्ट ठिकाणाहून वारवार दिवसा मोटार सायकल चोरी होत असल्याचे लक्षात आल्याने हिंजवडी पोलीस ठाणे वरिष्ठ पोलीस निरीक्षक डॉ. विवेकमुगळीकर यांनी तपास पथकातील अधिकारी श्री सागर काटे व श्री राम गोमारे यांना दोन टिम करून मोटार सायकल चोरीचे गुन्हे उघडकीस आणण्यास सुचना दिल्या होत्या. त्याप्रमाणे तपास पथकातील अंमलदार यांनी हिंजवडी पोलीस स्टेशन व वाकड पोलीस स्टेशन हददीतील चोरीचे ठिकाणे निश्चीत करून त्या परीसरातील सीसीटीव्ही फुटेज चेक करत असताना असे लक्षात आले की, एकच इसम हा वारंवार चोरी करताना दिसत होता.

दिनांक १९/०७/२०२३ रोजी पर्सिस्टंट कंपनी जवळुन दिवसा एक एच.एफ डिलक्स मोटार सायकल चोरी झाल्याने हिंजवडी पोलीस ठाणे येथे गु.र.नं.८०९/२०२३ भा.द.वि. कलम ३७९ प्रमाणे गुन्हा दाखल असताना गुन्हयाचे ठिकाणी असणाऱ्या सी. सी.टि.व्हि. फुटेजच्या आधारे हिंजवडी पोलीस ठाणे कडील तपास पथकातील अधिकारी व अंमलदार यांनी हिंजवडी पुणे ते सुपा अहमदनगर पर्यंत ३५० सी. सी.टि.व्ही. फुटेजची पाहणी केली असता तपास पथकातील पोलीस शिपाई २२८४ पालवे यांना गुप्त बातमीदारामार्फत बातमी मिळाली की, सी.सी.टि.व्हि फुटेज मधील इसम हा पाथरगव्हाण ता. पाथरी जिल्हा परभणी येथील असुन तो अधुन मधुन हिंजवडी येथील पांडवनगर परिसरात
राहण्यास येऊन काही दिवस राहून मोटार सायकल चोरून गावाकडे निघून जात असतो असे समजले. स्थाप्रमाणे वरीष्ठांचे आदेशाने हिंजवडी तपास पथकाचे सहा. पोलीस निरीक्षक राम गोमारे, पोलीस नाईक १५७६ अरुण नरळे, पोलीस शिपाई २२८४ कारभारी पालवे व पोलीस शिपाई २४०० दत्तात्रय शिंदे असे पाथरी पोलीस स्टेशन हद्दीतील पाथरगव्हाण ता. पाथरी जि. परभणी येथे जावुन संशयीत इसमास ताब्यात घेवुन त्याचे नाव व पत्ता विचारले असता त्याने त्याचे नाव व पत्ता रवि परमेश्वर घांडगे वय २३ वर्षे, रा. पाथरगव्हाण ता. पाथरी जि.परभणी असे असल्याचे सांगितले, त्याचेकडे दाखल गुन्हयातील चोरी गेलेल्या मोटार सायकलबाबत तपास केला असता त्याने सदरची मोटार सायकल चोरी करून ती विकास उध्दव घांडगे रा. पाथरगव्हाण ता. पाथरी जि.परभणी याला विक्री केली असल्याचे सांगीतले, त्यानंतर पाथरगव्हाण गावात शेतात सापळा रचून विकास घांडगे याला ताब्यात घेऊन त्याच्याकडे चौकशी केली असता त्याने सदर मोटर सायकल विकत घेतली असल्याचे सांगीतले. त्यानंतर विकास धांडगे याच्याकडे चौकशी करीत असताना गोपनीय माहीती मिळाली की आरोपी रवि परमेश्वर घांडगे याने ब-याच मोटार सायकल गाडया चोरी केल्या असून चोरी केलेल्या वाहणाची विकास उध्दव घांडगे हा शेतकरी लोकांना विश्वासात घेऊन गाडीचे कागदपत्रे दोन दिवसात आणून देतो असे खोटे सांगून विक्री केल्या आहेत. त्याप्रमाणे पोलीस पथकाने रवि परमेश्वर घांडगे याला विश्वासात घेऊन विचारपूस केली असता त्याने एकूण १५ दुचाकी वाहने शेतकरी लोकांना दिल्या असल्याचे सांगीतले. त्यानंतर त्या सर्व मोटार सायकल जप्त केल्या आहेत. त्यानंतर आरोपी रवि परमेश्वर धांडगे वय २३ वर्षे, रा. पाथरगव्हाण ता. पाथरी जि.परभणी याला अटक केली असून त्याला मा. न्यायालयाने दि. ०४/०८/२०२३ रोजी पर्यंत पोलीस कोठडी दिली आहे. अटक मुदतीत आरोपी याचेकडे अधिक तपास केला असता त्याने चोरी केलेल्या ३ मोटार सायकल हिंजवडी येथील त्याच्या नातेवाईकाच्या घरी विक्रीसाठी ठेवल्या होत्या त्या जप्त केल्या आहेत.
आरोपी याने खालीलप्रमाणे गुन्हे केल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. (१) हिंजवडी पोलीस ठाणे गु.र.नं. ८०९/२०२३ भा.द.वि. कलम ३७९ प्रमाणे.
२) हिंजवडी पोलीस ठाणे गु.र.नं. ७६८/२०२३ भा.द.वि. कलम ३७९ प्रमाणे.
३) हिंजवडी पोलीस ठाणे गु.र.नं. १७१ /२०२३ भा.द.वि. कलम ३७९ प्रमाणे.
४) वाकड पोलीस ठाणे गु.र.नं. २८६ / २०२३ भा.द.वि. कलम ३७९ प्रमाणे
५) वाकड पोलीस ठाणे गु.र.नं. ६३५/२०२२ भा.द.वि. कलम ३७९ प्रमाणे.
६) सहकारनगर पोलीस ठाणे पुणे शहर गु.र.नं.४८ / २०२२ भा.द.वि. कलम ३७९ प्रमाणे..
७) विश्रामबाग पोलीस ठाणे गु.र.नं. ३१४ / २०२९ भा.द.वि. कलम ३७९ प्रमाणे
८) सेलू पोलीस ठाणे परभणी गु.र.नं. १०/२०२३ भा.द.वि. कलम ३७९ प्रमाणे.
९) मानवत पोलीस ठाणे परभणी गु.र.नं. ६२/ २०२३ भा.द.वि. कलम ३७९ प्रमाणे.
(१०) नानलपेठ पोलीस ठाणे परभणी गु.र.नं. ४५४/२०१७ भा.द.वि. कलम ३७९ प्रमाणे.
(११) माजलगाव पोलीस ठाणे बीड गु.र.नं.४०/२०२२ भा.द.वि. कलम ३७९ प्रमाणे.
चोरीच्या दुचाकी बाबत वरीलप्रमाणे गुन्हे दाखल आहेत.
१२) युनिकॉन मोटार सायकल एम. एच. १२ एन.एल.२८३८
१३) पेंशन निळया रंगाची मोटार सायकल तिचा चॉसीनंबर ०४डी. ०९सी३८९०९
१४) पॅशन लाल रंगाची मोटार सायकल तिचा चाँसी नंबर एम.बी.एल.एच.ए.१० ई.एल.८९ एम. ०४०१० (१६) ड्रिम युगा मोटार साकयल लाल रंगाची एम.एच.३८ एन.००१७.
१५) पेंशन लाल नवीन मॉडेल एम.एच.२६ यु ३१७५
१७) पैशन प्रो मोटार सायकल एम.एच.२२ ए.जी. १५८९
१८) एक पांढऱ्या रंगाची अॅक्टीव्हा मोटार साकयल नंबर नसलेली.
अ.क्र.१२ ते १८ मधील मोटार सायकल बाबत कोठे गुन्हे दाखल आहेत याबाबत माहीती काढण्याचे काम चालू आहे.
आरोपी याने वरील प्रमाणे गुन्हे केलेल्याचे व त्याचेकडे एकुण ५.४०,०००/- रुपये किंमतीच्या १८ मोटार सायकल जप्त करण्यात आल्या आहेत. तसेच दाखल गुन्हयाचा अधिक तपास चालू असून आरोपी याचेकडुन आणखी गुन्हे केल्याचे उघड होण्याची शक्यता आहे.
सदरची कामगीरी मा. श्री विनयकुमार चौबे सो, पोलीस आयुक्त, पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालय, मा. श्री. डॉ. संजय शिंदे सो सह पोलीस आयुक्त पिंपरी चिंचवड, मा. श्री. डॉ. वसंत परदेशी सतो, अपर पोलीस आयुक्त पिंपरी चिंचवड, मा. श्री डॉ. काकासाहेब डोळे, पोलीस उप आयुक्त परिमंडळ २ पिंपरी चिंचवड, मा. श्री. डॉ. विशाल हिरे, सहा. पोलीस आयुक्त वाकल विभाग पिंपरी चिंचवड, मा. श्री डॉ. विवेक मुगळीकर, वरिष्ठ पोलीस निरीक्षक हिंजवडी पोलीस ठाणे, पिंपरी चिंचवड व मा. श्री सुनिल दहिफळे श्री. सोन्याबापु देशमुख पोलीस निरीक्षक (गुन्हे). हिंजवडी पोलीस ठाणे, पिंपरी चिंचवड यांचे मार्गदर्शनाखाली हिंजवडी पोलीस ठाणे कडील तपास पथकातील श्री. सागर काटे, श्री राम गोमारे सहा. पोलीस निरीक्षक, पोलीस अंमलदार बंड मारणे, बापु धुमाळ, बाळकृष्ण शिंदे, कैलास केंगले, कुणाल शिंदे, रितेश कोळी, अरुणा नरळे, श्रीकांत चव्हाण, चंद्रकांत गडदे, नरेश बलसाने, अमर राणे कारभारी पालवे, ओमप्रकाश कांबळे, दत्तात्रय शिंदे, सागर पंडीत यांनी केली.
ताजी बातमी व जाहिरातीसाठी संपर्कः
मोबा.नं. 9920601001
info@surakshapolicetimes.com
diptibhogal@surakshapolicetimes.com