मुंबईत सुवर्णकार संघातर्फे वृद्धाश्रमात दिवाळी फराळाचे वाटप…

प्रतिनिधी- महेश वैद्य
मुंबई:-मुंबई सुवर्णकार संघाच्या वतीने दिवाळी निमित्त गुरुवार दिनांक ०९/११/२०२३ रोजी सायंकाळी ५ वाजता डॉ. नागीनदास शहा मार्ग ( चिरा बाजार )येथील वृद्धाश्रमातील वृद्धांस दिवाळी फराळ वाटप करण्यात आला.

यावेळी मुंबई सुवर्णकार संघाचे सरचिटणीस श्री.अदिप वेर्णेकर ,संयुक्त चिटणीस श्री. रवींद्र देवरुखकर,कार्यकारणी सदस्य श्री.अशोक सोनी,जव्हेरी बाजार विभागाचे अध्यक्ष श्री. अमरनाथ घोसाळकर ,श्री.राजेश एकबोटे,कु.सोनल जाधव हे उपस्थित होते.
या कार्यक्रमाचे पुरस्कर्ते श्री.अदिप वेर्णेकर हे होते. यावेळी वृद्धाश्रमातील वृद्धांस फराळ वाटप करून दिवाळी साजरी करण्यात आली.
ताजी बातमी व जाहिरातीसाठी संपर्कः
मोबा.नं. 9920601001
info@surakshapolicetimes.com
diptibhogal@surakshapolicetimes.com