दिवसा घरफोडी करणारे अटटल गुन्हेगार अखेर स्थानिक गुन्हे शाखा अमरावतीकडून जेरबंद.

सह संपादक – रणजित मस्के
अमरावती :

पो. स्टे शेंदूरजना घाट येथे दिनांक २९/०४/२०२५ रोजी फिर्यादी नामे श्री. विश्वनाथ मुकुंदराव हरले वय ७२ वर्ष, रा. नवी वस्ती मालखेड यांनी पो. स्टे ला येवून जबानी रिपोर्ज दिला की, दिनांक २९/०४/२०२५ रोजी दुपारी त्यांचे राहते घरी कोनीही हजर नसतांना कोनीतरी अज्ञात भोरांनी त्यांचे पराचे दरवाज्याचा कुलूप कोडा तोडून घरातील लोखंडी कपाटातील घराचे बांधकामासाठी ठेवलेले नगदी १,५०,००० रू, एक ५ ग्रॅम वजनाची सोण्याची अंगठी किं. अं ३०,०००रू, तसेच एक १२ ग्रॅम वजनाची सोण्याची पोत किं अं ७२,०००रू असा एकून २,५२,०००रू या मुददेमाल चोरून नेला आहे अशा रिपोर्ट वरून पो.स्टे ला अप कमांक १६१/२०२५ कलम ३०५ (अ) बि.एन.एस प्रमाणे गुन्हा नोंद आहे.
अमरावती ग्रामीण जिल्हयात वाढत्या जबरी बोरी व घरफोडी च्या घटना पाहता मा. प्रभारी पोलीस अधिक्षक, अमरावती ग्रामीण, श्री. पंकज कुमावत (भापोसे) यांनी सदरचे गुन्हे उघडकीस आनण्यावावत योग्य मार्गदर्शन करून सुचना दिल्या होत्या.
त्या अनुषंगाने दिनांक ०३/०५/२०२५ रोजी सदर गुन्ह्याचा समांतर तपास करत असतांना, गुप्त बातमीदाकडुन खात्रीलायक बातमी मिळाली की, सदरची बोरी ही पांढुर्णा येथील राहणार प्रवीण गजभीये आणि करण भादा यांनी केली असुन सध्या तो मध्यप्रदेश येथील जिल्हा पांढुर्णा येथे प्रविण बोकळे रा. जयस्थंभ चौक याचे घरी भाडयाने राहतो आणि तो आज बोरीचे मुद्देमालाची विल्हेवाट लावण्याचे तयारीत असल्याची माहिती प्राप्त झाली असता मिळालेल्या माहितीप्रमाणे तात्काळ मध्यप्रदेश येचील पांढुर्णा जिल्हयातील जयस्तंभ चौकात जावुन सापळा रबला असता, प्रवीण प्रकाश गजभीये, वय ३२, रा. विचघाट ह.मु. प्रविण बोकळे, रा. जयस्थंभ चौक ता. जि पांढुर्णां हा पल्सर मोटार सायकलवर जयस्तंभ चौकातुन जात असतांना त्यास ताब्यात घेवुन गुन्हयाबाबत सखोल विचारपूस केली असता त्याने प्रथम उडवाउडवीची उत्तरे दिली त्याला पून्हा विश्वासात घेवून गुन्हयाबाबत विचारपूस केली असता त्याने सांगीतले की तो व त्याचे दोन साथीदारांनी ग्राम मालखेड आणि ग्राम रवाळा येथील घराचे कुलुप कोडा तोडुन सोन्याचे दागिणे व नगदी चोरी केल्याचे कबुल केले तसेच गुन्हा करणेकरीता त्यांनी पल्सर गाडी वापरल्याचे सांगीतले. त्याचे कडून गुन्हयात योरीस गेलेल्या मुद्देमालापैकी नगदी १,५०,०००/- रु आणि पिवळया धातुचे सोनेसदृश अंगठी-वजन अं. ५ ग्रॅम आणि एक पोत (४४मनी व एक डोरले) वजन अं. ५ ग्रॅम, किं.अं. ९६,०००/- आणि गुन्हा करण्यासाठी वापरलेले वाहन बजाज कंपनीची विनाकमांकाची काळया रंगाची पल्सर जिया चेसिस क. MD2868BX8SPK38635, किं.अं. १,००,०००/- रू दागिणे व नगदी असा एकुण ३,४६,०००/- रु चा मुद्देमाल जप्ती पंचनामाप्रमाणे पंचासमक्ष जप्त करण्यात आला.
त्यांचे कडून पोलीस अभिलेखावरील पो. स्टे शेंदूरजना घाट अपराध कमांक १) 161/2025 कलम 305 (a) वि.एन.एस 2) १६२/२५ कलम ३३१(३) (४), ३०५ (अ) बी.एन.एस असे दोन गुन्हे उघड करण्यात आले आहे. व पुढील तपास पोलीस स्टेशन शेंदूरजना घाट करीत आहे.
वसदरची कार्यवाही मा.प्रभारी पोलीस अधिक्षक, अमरावती ग्रामीण श्री. पंकज कुमावत (भाषीमे) यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक स्था.गु.शा अमरावती ग्रामीण किरण वानखडे यांचे नेतृवात पो.उप.नि सागर हटवार, व पोलीस अंमलदार रविंद्र बावणे, गजेंद्र ठाकरे, गजानन दाभने, भुषन पेठे, पंकज फाटे चालक प्रशीक वानखडे यांनी केली.