दिवसा घरफोडी करणारा माॅनटया माने यास पुणे गुन्हे शाखा युनिट ५ ने केले जेरबंद

सह संपादक – रणजित मस्के
पुणे
हडपसर पोलीस स्टेशन गुन्हा रजिस्टर नंबर ३४५/२०२५ भारतीय न्याय संहिता सन २०२३ कलम ३०५(अ), ३३१ (३) प्रमाणे घरफोडीचा गुन्हा दाखल करणेत आलेला होता. पोलीस निरीक्षक वाहीद पठाण यांनी गुन्हयाचा आढावा घेवुन समांतर तपास करुन गुन्हा उघडकीस आणणे बाबत युनिट पथकाला सुचना दिलेल्या होत्या.
पोलीस अमंलदार अमित कांबळे यांना त्यांचे गुप्त बातमीदारांकडुन माहिती मिळाली की, दाखल गुन्हा हा पोलीस रेकॉर्डवरील आरोपी नामे. मॉन्टया उर्फ आर्यन माने याने केला आहे अशी बातमी मिळाल्याने लागलीच आरोपी नामे. मॉन्टया ऊर्फ आर्यन अजय माने, वय.२२ वर्षे, रा. वंदे मातरम चौक, नवीन मस्जीदच्या समोर, रामटेकडी हडपसर पुणे यास शिताफीने पकडुन त्यास ताब्यात घेवुन त्याचेकडे तपास करुन दाखल गुन्हा उघडकीस आणलेला असुन आरोपीकडुन दाखल गुन्हयामधील चोरीस गेलेल्या रक्कमेपैकी १,४०,०००/- रुपये रोख रक्कम तसेच आरोपीने गुन्हा करण्याकरीता वापरलेली मोटर सायकल जप्त करुन गुन्हा उघडकीस आणुन सदर आरोपीस पुढील कार्यवाही करीता हडपसर पोलीस स्टेशनचे ताब्यात दिले आहे.
सदरची कामगिरी मा. अपर पोलीस आयुक्त, गुन्हे श्री. शैलेश बलकवडे, मा. पोलीस उप आयुक्त गुन्हे श्री. निखिल पिंगळे, मा. सहायक पोलीस आयुक्त गुन्हे २ श्री. राजेंद्र मुळीक यांचे सुचना व मार्गदर्शनाप्रमाणे युनिट ०५ गुन्हे शाखा, पुणे शहर कडील पोलीस निरीक्षक श्री. वाहीद पठाण पोलीस अंमलदार राजस शेख, अमित कांबळे, विनोद शिवले, प्रताप गायकवाड, पृथ्वीराज पांडुळे, तानाजी देशमुख, सचिन मेमाणे, पल्लवी मोरे, स्वाती तुपे, अकबर शेख व म.पो. अमंलदार शुभांगी म्हाळशेकर यांचे पथकाने केली आहे.