जिल्हा पोलीस अधीक्षक, श्री. निखिल पिंगळे, यांचे संपुर्ण गोंदिया जिल्हा वासियांनी गणेशोत्सव, ईद-ए-मिलाद, उत्सव निर्विघ्नपणे, शांततेत, सौहार्दपूर्ण, चांगल्या वातावरणात पार पाडल्याबद्दल सर्वांचे मानलेत मनःपूर्वक आभार…

उपसंपादक- रणजित मस्के
गोंदिया :
जिल्ह्यात सण- 2023 ला दिनांक 19-09-2023 ला गणेश उत्सवास सुरवात होवून हिंदू समाज बांधवांतर्फे दिनांक 03-10-2023 या कालावधी पर्यंत उत्सव साजरा करण्यात आला. तसेच या दरम्यान कालावधीत दिनांक 28-09-2023 रोजी मुस्लिम धर्मीय समाज बांधवांनी ईद-ए-मिलाद उत्सव साजरा केला. आणि दिनांक 28-09- 2023 ते 3-10-2023 या दरम्यान गणेश मूर्तीचे (गणपती बाप्पाचे) आनंदात, उत्साहात विसर्जन करण्यात आले.
स्थापना ते विसर्जन या दरम्यान कालावधीत अतिशय सुंदर, आणि चांगल्या, सौहार्दपूर्ण वातावरणात जिल्ह्यातील सर्व समाज बांधवांनी, नागरिकांनी सर्वांनी अत्यंत शांततेत, उत्साहात, मनोभावे उत्सव साजरा केला.
या अनुषंगाने पोलीस अधीक्षक गोंदिया श्री. निखिल पिंगळे, यांनी गोंदिया जिल्हा पोलिस प्रशासनाचे वतीने, त्याच प्रमाणे उत्सव शांततेत पार पाडण्यासाठी प्रशासनास सहकार्य करणारे, ईतर विभाग जसे महसूल विभाग, एमएसईबी, सार्वजनिक बांधकाम, आरोग्य विभाग, पाणी पुरवठा, सर्व सामाजिक संस्था, ईत्यादी त्याचप्रमाणे उत्सव कालावधीत जिल्ह्यातील सर्व जनतेचे, रहिवाशांचे, नागरिकांचे, ज्यात- सर्व समाज, पंथ, गट, लोकप्रतिनिधी,विविध पक्ष संघटनेचे कार्यकर्ते, मंडळाचे पदाधिकारी, पत्रकार बंधू,l लहान, मोठे, थोर, स्त्री पुरुष प्रतिष्ठीत नागरिक, तसेच प्रतिबंधित केले असलेले लोक, सर्व वर्गाचे नागरिक आपण सर्वांनी गोंदिया जिल्हा पोलीस प्रशासनास दिलेल्या चांगल्या प्रतिसादाबद्दल , केलेल्या सहकार्याबद्दल , मनपूर्वक आभार व्यक्त केले आहे. त्याचप्रमाणे येणाऱ्या नवरात्री उत्सव काळात सुध्दा सहकार्य करण्याचे आवाहन केले आहे.
त्याचप्रमाणे जिल्ह्यात कायदा सुव्यवस्था राखून अत्यंत शांततेत उत्सव पार पाडण्यासाठी अहोरात्र मेहनत करून परिश्रम घेवून कुठल्याही प्रकारचा कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होवू न देता आपले कर्तव्य चोख बजावल्या बद्दल सर्व पोलीस अधिकारी, अंमलदार यांचे सुध्दा कौतुक करून सर्वांचे आभार व्यक्त केले आहे.
ताजी बातमी व जाहिरातीसाठी संपर्कः
मोबा.नं. 9920601001
info@surakshapolicetimes.com
diptibhogal@surakshapolicetimes.com